कंधार तालुक्यातील 82 ग्रामपंचायतीचे दूपारी साडे तिन वाजेपर्यत 67 टक्के झाले मतदान ;
तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांची माहीती
कंधार ; दिगांबर वाघमारे
कंधार तालुक्यातील 82 ग्रामपंचायतीसाठी सुमारे 279 मतदान केंद्रावरून आज दि.15 रोजी चालु असलेल्या मतदानाची टक्केवारी दुपारी 3.30 वाजेपर्यंत 67.72 टक्के मतदान झाले असल्याची माहीती. तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली असून काही तरळक घटणा वगळता मतदान शांततेत चालु असल्याची माहीती यावेळी नायब तहसिलदार सुर्यकांत ताडेवार यांनी दिली.
दरम्यान जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांनी कंधार तालुक्यातील चिखली ,हाळदा,लाठखुर्द,उस्माननगर ,शिराढोण आदी मतदान केंद्राना भेट देवून मतदान केंद्राचा आढावा घेतला.तर तहसिलदार तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी बहाद्दरपुरा ,घोडज,फुलवळ,पांगरा,उस्माननगर ,नंदनवन,बाचोटी ,घोडज,पानशेवडी,नागलगाव,कुरुळा आदी ठिकाणी भेट दिली.
मतदानाची टक्केवारी दुपारी 3.30 वाजेपर्यंत स्त्री 47714 व पुरुष 45857 असे मतदान झाले असून मतदान टक्केवारी सुमारे 67.72% टक्के एवढे मतदान झाले आहे.
शेवटची मतदानाची पुर्ण टक्केवारी बुथ निहाय सर्व बुथ ची माहीती संकलीत होणार असल्याने व तालुक्यातील ब-याच मतदान केंद्रावर रांगाच रांगा असून मतदान प्रक्रिया पुर्ण होण्यास विलंब होणार आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी तहसीलदार व्यंकटेश मुंडे ,नायब तहसीलदार नयना कुलकर्णी ,नायब तहसीलदार विजय चव्हाण,नायब तहसिलदार ताडेवार यांच्या नियोजनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे.
तहसील कार्यालयातील कर्मचारी उत्तम जोशी,पुंडलीक लखमावाड ,मन्मत थोटे,बाबुराव अंभगे,संजय केंद्रे , राम बोंदकुले,शेख जिलानी,शिवहार करंदे,अथर सर्वरी, नईन बेग ,राखे ज्ञानेश्वर,प्रशांत मळगे,श्रीकांत दासरे,गंगाधर गोंटे,संगमेश्वर टोपारे,अंकुश देशमुख सह कर्मचारी परिश्रम घेत आहेत.