कंधार ;प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील अंबुलगा ग्रामपंचायत 11 सदस्यांची आहे. अंबुलगा ,पिंपळ्याचिवाडी, ब्रह्मवाडी, टोकवाडी,अशा तिन वाड्या व आंबुलगा मिळून सदरील ग्रामपंचायत ही बनली आहे.
आज दिनांक 15 जानेवारी रोजी झालेल्या मतदानात आबालवृद्ध महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने मतदानाची सरासरी 80 टक्के एवढी झाली आहे.
सदरील अंबुलगा ग्रामपंचायत मध्ये प्रमुख दोन पॅनल होते. त्यामध्ये माजी जि. प.सदस्य मनोहर पाटील तेलंग व कार्यकर्ते माधव मुसळे यांच्या दोन पॅनल मध्ये टक्कर होती. या आज झालेल्या मतदानात बाजी कोण मारणार ? यावरून दिवसभर चर्चा ऐकली असता माधवराव मुसळे यांचे पॅनलचे वर्चस्व राहील असे बोलले जात होते.
परंतु दिनांक 18 रोजी होणाऱ्या निकालानंतर गावकऱ्यांनी मतदान कोणाच्या बाजूने केले व कोणाला तारले हे निकाला नंतर मात्र समजणार आहे.