कंधार तालुक्यातील ग्रामपंचायतीचे एकुण 81.37 टक्के मतदान ; तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांची माहीती

कंधार ; दिगांबर वाघमारे

कंधार तालुक्यातील 82 ग्रामपंचायतीसाठी सुमारे 279 मतदान केंद्रावरून आज दि.15 रोजी झालेल्या एकुण मतदानाची टक्केवारी 81.37 टक्के मतदान झाले असल्याची माहीती. तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली.

कंधार तालुका अंतरिम मतदान टक्केवारी :-
स्त्री -53243
पुरुष-59196
एकुण- 1,12,439
टक्केवारी – 81.37 %

दरम्यान जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर यांनी कंधार तालुक्यातील चिखली ,हाळदा,लाठखुर्द,उस्माननगर ,शिराढोण आदी मतदान केंद्राना भेट देवून मतदान केंद्राचा आढावा घेतला.तर तहसिलदार तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी बहाद्दरपुरा ,घोडज,फुलवळ,पांगरा,उस्माननगर ,नंदनवन,बाचोटी ,घोडज,पानशेवडी,नागलगाव,कुरुळा आदी ठिकाणी भेट दिली.

निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी तहसीलदार व्यंकटेश मुंडे ,नायब तहसीलदार नयना कुलकर्णी ,नायब तहसीलदार विजय चव्हाण,नायब तहसिलदार ताडेवार यांच्या नियोजनाखाली निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे.
तहसील कार्यालयातील कर्मचारी उत्‍तम जोशी,पुंडलीक लखमावाड ,मन्मत थोटे,बाबुराव अंभगे,संजय केंद्रे , राम बोंदकुले,शेख जिलानी,शिवहार करंदे,अथर सर्वरी, नईन बेग ,प्रशांत मळगे,श्रीकांत दासरे,गंगाधर गोंटे,संगमेश्वर टोपारे,अंकुश देशमुख सह कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *