तालुकाध्यक्षा सौ.अँड.जयमंगल औरादकर यांची माहीती
कंधार ; प्रतिनिधी
भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांचा दुर्देवी मृत्यूच्या घटने च्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक व मूलभूत सुविधांचा भाजपा महिला मोर्चा प्रदेशउपाध्यक्षा सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दि.१६ रोजी ठिकठिकाणी आढावा घेण्यात आला.त्याचाच एक भाग म्हणून
महिला मोर्चा भाजपा कंधार तालुक्याच्या वतीने कंधार रुग्णालयातील सुविधा बाबत आढावा घेण्यात आला.
ग्रामिण भागातील सर्व सामान्य नागरीकांना सरकारी रुग्णालय महत्वाचे असते.रुग्णालयातील असुविधांमुळे जो रुग्णांना त्रास होत आहे त्यांची नोंद द्यावी व सर्व सुविधा सुरळीत ठेवाव्यात यासाठी म्हणून दि.१६ जानेवारी रोजी उपस्थित माजी वैद्यकिय अधिकारी अरविंद फिसके व अन्य डॉक्टरा मार्फत कंधार येथिल वैद्यकिय अधिक्षकांना निवेदनही देण्यात आले.
यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्षा सौ.चित्ररेखाताई गोरे,कंधार तालुकाध्यक्षा सौ.अँड. औरादकर,ओबीसी तालुका अध्यक्षा सौ.सुनंदा वंजे,महिला तालुका सरचटनिस सौ.कल्पना गित्ते आदीसह महीलांची यावेळी उपस्थिती होती.