सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत आज भोकर शहरात व तालुक्यातील १९४ कोटीच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा

भोकर ; प्रतिनिधी


भोकर शहरातील व तालुक्यातील १९४ कोटीच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकरावजी चव्हाण यांच्या उपस्थितीत आज दि. २२ जानेवारी २०२१ रोजी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात ना. अशोकराव चव्हाण यांच्या रूपाने सार्वजनिक बांधकाम मंत्री पद मिळाल्याने तालुक्यातील विविध विकास कामे मार्गी लागत असून त्या कामाचा भूमिपूजन सोहळा करण्यात येत आहे.

दि. २२ जानेवारी रोजी भोकर शहर व तालुक्यातील १९४ कोटीच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून सायंकाळी ४ वाजता भोकर येथील मोंढा मैदानावर जाहीर सभा व आभार सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र विधान परिषदेतील प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर, जि.प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर ,जि.प. कृषी पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर,नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हरिहरराव भोसीकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ कोकाटे, जि. प. गटनेता प्रकाश भोसीकर, माजी सभापती नागनाथ घिसेवाड, पं.स. सभापती निता रावलोड,कृउबा संचालक सुभाष पाटील किन्हाळकर, आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


विविध विकास कामांचे भूमिपूजन


हादगाव ,तामसा, भोकर, उमरी, कारेगाव, लोहगाव, रस्त्याचे पेवर शोल्ड सह दुपदरीकरण करणे, भोकर मधील विश्रामग्रहाचे बांधकाम, मुदखेड भोकर रस्ता 161( अ) सुधारणा करणे, भोकर शहरासाठी वळण मार्गाचे बांधकाम, औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, भोकर येथे १८०० मे. टन क्षमतेच्या नवीन शासकीय धान्य गोदामाचे बांधकाम, भोकर नगर परिषद विविध विकास योजनेअंतर्गत 14 कोटी ची कामे, अशा विविध विकासकामांचा शुभारंभ होणार असून सायंकाळी ४ वा. मोंढा मैदान भोकर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे .

या कार्यक्रमास नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जगदीश पाटील भोसीकर ,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अॅड.शिवाजी कदम, शिवसेनेचे तालुका प्रमुख अमोल पवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष इनामदार,उपसभापती गणेश राठोड, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर ,साहेबराव सोमेवाड, गोविंद बाबागौड,शेख युसुफ,उपसभापती नागोराव कोटुळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *