कंधार ; प्रतिनिधी
मानसपुरी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्रीमती कुसुमबाई दुलबाराव मानुसपुरे यांचा निधनाने रिक्त झालेल्या सरपंच पदी त्यांच्या सुनबाई स्मिता संभाजीराव मानसपुरे यांची निवड केली होती.परंतु काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने सरपंच पदी स्मिता मानसपुरे सरपंच पदावर विराजमान झाल्या नव्हत्या .त्या प्रकरणी माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी लक्ष देवून सरदील प्रकरणी असलेला वाद मिटवण्यास मार्गदर्शन केल्याने पुन्हा स्मिता संभाजीराव मानसपुरे सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.
त्याबद्दल लोहा येथे माजी आमदार रोहीदास चव्हाण यांची भेट घेतली त्यावेळी उपस्थित सरपंच प्रतिनिधीचा सत्कार दि.२३ रोजी करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायतीला निधी मिळवून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या पुढाकारातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन शिष्टमंडळास माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी दिले.
यावेळी बालाप्रसाद माणूसपुरे,उपसरपंच किरण कोकाटे, संभाजी मानसपुरे ,शंकरअण्णा चिवळे, गणेश गोरे आदीसह कार्यक्रते उपस्थित होते.