नांदेड येथील पत्रकार मारोती शिकारे व शंकर सिंह ठाकूर यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार.

नांदेड (प्रतिनीधी)

महाराष्ट्र राज्यातील सरपंचांसाठी कार्यरत असलेल्या, सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून अनेक गावे आदर्श तयार करण्याचे तसेच सरपंचांना सन्मान मिळवून देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्य केले जाते.त्याच बरोबरीने आपण समाजाचे काही देणे लागतो या हेतूने विविध उपक्रम राबवित असतात.

त्याचाच एक भाग म्हणून मान कर्तृत्वाचा, सन्मान नेतृत्वाचा या राज्यस्तरीय विविध पुरस्कार देऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते. त्याच अनुषंगाने ‘ मानकर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय विविध पुरस्कार वितरण सन्मान सोहळा – २०२० शुक्रवार दि.२२ जानेवारी २०२१ रोजी शिरडी येथे संपन्न झाला. या पुरस्कार सन्मान सोहळ्यांच्याकार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.

शंकर सिंह ठाकूर


या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, मानचिन्ह, फेटा व शाल असे होते.या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये आदर्श सरपंच, उद्योग भूषण, पत्रकारिता, युवारत्न, प्रशासकीय सेवा, सामाजिक, शैक्षणिक, कोरोना योध्दा, मीडिया, कृषी, व्यापार, कला, राजकिय, महसूल, वैद्यकीय,आध्यत्मिक, ऐतिहासिक, दिव्यांग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानीत करण्यात आले.

मारोती शिकारे

नांदेड येथील पत्रकार शंकर सिंह ठाकूर,मारोती शिकारे यांना सन्मानित करण्यात आले . हा सन्मान सोहळा सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळून,शिस्तबद्ध, शांत वातावरणात शिर्डी येथे कार्यक्रम संपन्न झाला.

त्यावेळी संस्थापक यादवराव पावसे, अध्यक्ष भाऊ मरगळे, राज्यध्यक्ष विक्रम भोर, मार्गदर्शक जयदीप वानखेडे, राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे, स्वागताध्यक्ष प्रदीप हासे, कार्याध्यक्ष रवींद्र पवार, शंकरराव खेमनर, भाग्यश्री नरवडे, अँड भाऊसाहेब गुंजाळ, पंकज चव्हाण, रविराज गाटे, गणेश तायडे, अंनत ऊर्फ बाळासाहेब निकम हे उपस्थित होते.या पुरस्कारा बद्दल राजकीय,सामाजिक व मित्र परिवारा कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *