नांदेड ; प्रतिनिधी
निसारजी तांबोळी पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र यांची महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ.प्रणिता देवरे चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.२७ जानेवारी रोजी भेट घेऊन दिवशी (बू)ता.भोकर जि. नांदेड येथील पीडित मुलीच्या कुटुंबियांना न्याय देण्याची व गुन्हेगाराला कडक शासन करण्याची मागणी चे निवेदन दिले.
शेतात काम करत असलेल्या नराधमाने चिमुकलीवर अमानवी अत्याचार करून बळी घेण्याची दुर्दैवी घटना भोकर तालुक्यातील दिवशी येथे घडली. या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्र सह नांदेड जिल्ह्यात उमटले असून नांदेडच्या सक्षम पोलिस यंत्रणेकडून या नराधमास फाशीची शिक्षा झाली पाहिजे .
यासाठी सूक्ष्म तपास यंत्रणा राबवून अतिजलद न्यायालयात खटला चालवण्याची व सरकारी वकील म्हणून उज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करावी असे शासनाकडे मागणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा च्या अध्यक्षा उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
यावेळी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सौ.प्रणिता देवरे चिखलीकर, महानगर अध्यक्ष प्रविण भाऊ साले,महिला मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्या सौ शितल भालके, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.चित्ररेखाताई गोरे, जिल्हा अध्यक्षा सौ.मीनलताई खतगावकर,महादेवी मठपती सह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.