सामाजिक एकता निर्माण करण्यासाठी संघटनात्मक बांधणी आवश्यक- मा.प्रदिपभाऊ वाघमारे

हिमायतनगर ; प्रतिनिधी

लहुजी शक्ती सेना हिमायतनगर तालुका कमिच्या वतिने दि-03/02/2021 रोजी महात्मा फुले स्मारक हिमायतनगर येथे महत्वपूर्ण बैठक आयोजीत करण्यात आली होती,त्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत असताना,एकिच्या बळावर समाज आपले अस्तित्व निर्माण करु शकतो,आपली ताकद निर्माण करु शकतो,आपले प्रश्न शाशन दरबारी मांडु शकतो आणि आपले हक्क आणि अधिकार प्राप्त करू शकतो, असे त्यांनी सांगितले पुढे बोलताना सांगितले,मा. विष्णु कसबे यांच्या नेतृत्वाखाली लहुजी शक्ती सेना मातंग समाजाच्या प्रश्नावर महाराष्ट्र राज्यासह सात राज्यात काम करतेआपणही आपल्या तालुक्यात गाव तिथे शाखा निर्माण करुन संघटन मजबूत करावे अशि विनंती केली .

भविष्यात सामाजिक एकता निर्माण करण्यासाठी संघटनात्मक बांधणी आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले बैठकीला प्रमुख उपस्थिती नागोराव आबंटवार (मराठवाडा युवक अध्यक्ष) प्रदिपभाऊ वाघमारे (मुख्य मार्गदर्शक तथा प्रवक्ते तथा जिल्हाध्यक्ष नांदेड)के.डी.पवार युवक (संपर्क प्रमूख) संतोषभाऊ वाघमारे (हदगाव तालुकाध्यक्ष) गजानन वाघमारे नांदेड तालुका सचिव,चंद्रकांत वाघमारे, गंगाधर वाघमारे यांची होती.या बैठकी मध्ये नवीन पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या.

संघटनेचे पुढील काळात ध्येय धोरणे ठरविण्यात आले,बैठकीचे आयोजन लहुजी शक्ती सेना हिमायतनगर तालुका कमिटीच्या वतिने करण्यात आले होते,या कार्यक्रमाला हिमायतनगर येथिल समाज बाधंव व महिला उपस्थित होत्या, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लहुजी शक्ती सेना हिमायतनगर कमिटीतील सर्वच पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *