हिंगोली ; प्रतिनिधी
वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक जिल्हा परिषद हिंगोली येथील कार्यालयातील प्रभारी अधिक्षक कपाळे बि पी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यवाही मुळे ते पदमुक्त झाले. त्यामुळे या वेतन पथकात एकही कर्मचारी कार्यरत नाही त्यामुळे पगार झाले नाहीत यामुळे कर्मचारी अर्थिक अडचणीत आला आहे.रखडलेले वेतन त्वरीत न मिळाल्यास आंदोलन करु -जिल्हा अध्यक्ष महाजन कांचन कुमार यांनी दिला आहे.
हिंगोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मु.अ संघ जिल्हा अध्यक्ष महाजन कांचन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील मुख्याध्यापक यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद हिंगोली यांना निवेदन देऊन दोन तीन दिवसात वेतन मिळणे बाबत कार्यवाही करावी जर वेतन मिळाले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन दिले आहे.
यावेळी पी.एस.बुंदूक,अ.मन्नान मकसूद,डी.के.पोफळे,बी.के.सरनाईक,आर.पी.खिल्लारे,आर.व्ही.बोरकर,बी.डी.भिस्से,पठाण अब्बासखॉन,यु .के.एरेकार,एम.एस.सवंडकर,आर.व्ही.वाबळे,एच.एल.सावंत,अशोक वेले,गडदे एम.डी,मईंग ए.एस.आदीसह जिल्ह्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते.