लोहा ; प्रतिनिधी
डोंगरगाव तालुका लोहा
येथे शेतकऱ्यांचा ऊस 30 ते 40 एकर जळाल्याची माहिती मिळताच
युवानेते प्रवीण पाटील चिखलीकर यांनी तात्काळ डोंगरगाव येथे शेतामध्ये जाऊन पाहणी केली व महावितरणच्या अधिकाऱ्यांना व कृषी अधिकारी तलाठी यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले .
कारखान्याला जळालेला ऊस नेण्याचे सांगितले तसेच शेतकऱ्यांचे सांत्वन करून मी तुमच्या पाठीशीसं आहे सांगीतले .
यावेळी उपस्थित कैलास गिरी महाराज,महावितरण विभागाचे राठोड,डोंगरगावचे पोलीस पाटील विश्वनाथ पाटील जाधव,नवनाथ माली पाटील,माधव पाटील, डोंगरगावकर खंडेराव जाधव,माधव बालाजी जाधव,राजू जाधव.पाटील जाधव.
तसेच नुकसानग्रस्त उपस्थित शेतकरी बांधव बाळू अप्पा मुदाळे,
सुरेश अप्पा मुदाळे,
माधव धोंडीबा जाधव,आदीची यावेळी उपस्थिती होती.