शिक्षकनेते राजहंश शहापुरे यांच्या वतिने सत्कार
कंधार ; ता.प्र.
कंधार तालुका पञकार संघाची बैठक शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आली .यावेळी कार्यकारणी निवडीबाबत चर्चा करण्यात येवून तालुकाध्यक्ष म्हणून सचिन मोरे व सचिव म्हणून डॉ.दिनकर जायभाये यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
दि.9 फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या बैठकीत कंधार तालुका पञकार संघाची खालील प्रमाणे कार्यकारणी निवड करण्यात आली. तालुका अध्यक्ष – सचिन मोरे , सचिव – डॉ.दिनकर जायभाये ,तालुका उपाध्यक्ष- विनोद तोरणे ,संघपाल वाघमारे , कोषाध्यक्ष- राजरत्न गायकवाड ,सहसचिव – वैजनाथ गिरी ,हबीब सय्यद ,प्रसिद्धी प्रमुख – मयुर कांबळे ,प्रकाश गित्ते ,सल्लागार – प्रा.माधव गित्ते ,नईम बेग ,कार्यकारणी सदस्य-ए.एल सरवरी ,शादुल शेख ,कांतीलाल राठोड ,यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या निवडीबदल दि.10 रोजी शिक्षकनेते राजहंश शहापुरे व मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी कैलास बुक सेंटरचे दत्तात्रय मामडे, माजी केंद्रप्रमुख यु.एन.चिद्रावार ,माजी उपमुख्याध्यापक नारायण बनसोडे,दिगांबर वाघमारे आदीची उपस्थिती होती.