प्रभु श्रीराम चंद्राच्या मंदिर बांधकामामुळे श्रीराम भक्तात नव चैतन्य निर्माण झाले -आ भिमराव केराम

अर्धापूरातुन मंदिर बांधकामासाठी पाव्वने दोन लाख रूपये निधी जमा

अर्धापूर (प्रतिनिधी)

प्रभु श्रीराम चंद्राचे अयोध्येतील मंदिर श्रीराम भक्तात नवचैतन्य निर्माण करणारे असुन श्रीराम मंदिर बांधकामासाठी प्रत्येकांनी पुढाकार घेऊन निधी द्यावा असे आवाहन आ.भिमराव केराम यांन धर्म सभेत बोलतांना श्रीराम भक्तांना केले आहे.

भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अँड किशोर देशमुख यांच्या पुढाकारातून अर्धापूर येथील देशमुख मंगल कार्यालयात येथे साधुसंतांच्या प्रमुख उपस्थितीत धर्म सभेचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी गुरुवर्यानी श्रीखंडोबा,महादेव मंदिरात पुजा आरती करून श्रीराम मंदिर निधी संकलन रॅली काढण्यात आली होती.
संत श्री महंत राजेंद्रपूरू महाराज कुर्तडी,योगी संत श्यामबापू महाराज माहूर,श्री.ष.ब्र.प.१०८ विरूपाक्षी महाराज मुखेड,श्री.ष.ब्र.प.१०८ काशीनाथ शिवाचार्य महाराज पाथरी,संत ह.भ.प.वैजेनाथ कागदे उमरी,संत दयाल गिरी महाराज चिदगीरी,संत ज्ञान भारती महाराज केशवगिरी,संत दिगांबर गिरी महाराज मेढला,
संत कानेराव बुवा रोही पिंपळगाव
तसेच प्रमुख उपस्थितीत आ.भिमराव केराम,भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर,जेष्ठ नेते धर्मराज देशमुख,जिल्हा सरचिटणीस गंगाधर जोशी,जि.प.सदस्य प्रविण पाटील चिखलीकर,भाजपा नेते अँड. रमन जायभाये,
रेल्वे सल्लागार समिती सदस्य मिलिंद देशमुख,माजी सभापती बंडू पावडे,सरचिटणीस डॉ.लक्ष्मण इंगोले,बाबुराव हेंद्रे,निलेश देशमुख
आदी मान्यवर उपस्थितीत होते.प्रथम गुरुवर्य व मान्यवरांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमा व श्रीरामच्या पुतळाचे पुजन व दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी श्रीराम बांधकामासाठी अॅड.किशोर देशमुख ५१००० हजार रुपये श्रीमती अनुसयाबाई लंगडे ५१००० ह.रू, संत श्री महंत राजेंद्रपूरू महाराज कुर्तडी २१००० ह. रू यांच्या सह अनेक श्रीराम भक्तांनी पाव्वने दोन लाख रुपये श्रीराम मंदिर बांधकामासाठी निधी जमा केला आहे. यावेळी
आ भिमराव केराम पुढे बोलताना म्हणाले की अयोध्येत श्रीरामचे मंदिर व्हावे यासाठी कारसेवकांनी
केलेल्या कार्यामुळे आज अयोध्येत भव्य मंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे श्रीराम मंदिरासाठी श्रीराम भक्तानी आपण काही श्रीरामाचे देणे लागतो या भावनेतून श्रीराम मंदिरासाठी निधी समर्पन करावे असे आवाहन त्यांनी उपस्थितीतांना केले.
तसेच योगी संत शामबापू भारती महाराज म्हणाले की अयोध्येत श्रीराम मंदिर हे हिंदू धर्मातील अस्मिता असुन श्रीराम मंदिर हे जगातील सर्वात मोठे मंदिर होणार आहे या सर्व श्रीराम भक्तानी पुढाकार घेऊन निधी समर्पन करावे असे आवाहन योगी संत श्यामबापू भारती महाराज यांनी केले आहे.यावेळी गुरुवर्यानी धर्मसभेला मार्गदर्शन केले तसेच बजरंग दलाचे देवगिरी प्रांत प्रमुख कृष्णा देशमुख,व्यंकटराव पाटील गोजेगावकर,प्रविण पाटील यांची समयोचित भाषणे झाली या वेळी युवा नेते विराज देशमुख,दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष आत्माराम राजेगोरे,
तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी,सुधाकर कदम,बाबुराव लंगडे,शहराध्यक्ष विलास साबळे,युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप घोडेकर,कृष्णा इंगोले,तालुकाध्यक्ष जठन मुळे पाटील,देवा धबडगे,तुळशीराम बंडाळे,शंकरराव मुतकलवाड,
प्रल्हाद माटे,डिगांबर टिप्परसे,माधवसिंह ठाकूर,
परमेश्वर लालमे,योगेश हळदे,तुकाराम साखरे,शिवराज जाधव,तुकाराम माटे,परमेश्वर देशमुख,आनंद वैदे,अंबादास आंबेगावकर,रमाकांत हिवराळे,अंगद मगनाळे,अनिल बाच्चेवार,याच्या अनेकांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामराव भालेराव यांनी केले तर सुत्रसंचालक सचिन कल्याणकर यांनी केले तर विराज देशमुख यांनी आभार मानले
यावेळी श्रीराम भक्त मंडळीं मोठ्या संख्येने उपस्थितीत होते यावेळी श्रीराम मंदिर बांधकामासाठी अनेकांने
निधी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *