कंधारः- (डॉ.माधव कुद्रे)
श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी ता.कंधारचे श्री शिवाजी कॉलेज, कंधार येथे मंगळवार दि.२ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी ठीक २ वाजता ५२ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी. नांदेडचे कर्नल जी.आर.के शेषासाई व मेजर विक्रम यांनी भेट दिली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.आर.पगडे व कॅप्टन डॉ.दिलीप सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. प्राचार्य डॉ.जी.आर पगडे यांच्याशी चर्चा करताना कर्नल जी.आर.के.शेषासाई म्हणाले की, ही संस्था अतिशय जुनी असून फार मोठी आहे. निसर्गरम्य व सुंदर परिसरात हे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाची विद्यार्थीसंख्या भरपूर आहे. येथे बी.ए., बी.कॉम. व बी.एस्सी. या पदवींचा अभ्यासक्रम असून ४ विषयात एम.ए.इतिहास, समाजशास्त्र व एम.एस्सी. वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र या विषयात पी.जी. आहे. येथील एन.सी.सी.चे विद्यार्थी पूर्ण देशभरात भारतीय सैन्य दलात, वनरक्षक, पोलीस, नेव्ही दलात कार्यरत आहेत. आतापर्यंत लाखो विद्यार्थी एन.सी.सी.मुळे नोकरीत आहेत.
ग्रामीण भागातले विद्यार्थी फार कष्टाळू व मेहनती असून रनिंगमध्ये नेहमीच आघाडीवर असतात. या महाविद्यालयात बी.व सी. सर्टिफिकेट कॕडेटसाठी दि.७ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत कॅम्पचे आयोजन केले आहे. एन.सी.सी. कॅडेटच्या नवीन भरती झालेल्या विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन फॉर्मची पडताळणी अन्सारी रियाज यांनी केली आहे. या महाविद्यालयात इतिहास संशोधन केंद्र असून आतापर्यंत डॉ.अनिल कठारे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० विद्यार्थ्यांनी पी.एच.डी.चे संशोधन केले आहे. तसेच प्रा.विजया साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली ४ विद्यार्थ्यांनी पी.एच.डी.चे संशोधन केले आहे, असे ते म्हणाले. यावेळी मेजर विक्रम, अन्सारी रियाज, श्री गवळी व डॉ.दिलिप सावंत आदींची उपस्थिती होती.