कंधार ; प्रतिनिधी
मातोश्री रमाबाई भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्था, बेटमोगरा, ता.मुखेड जि.नांदेड यांच्या वतीने नामवंत पत्रकार तथा स्वच्छतादूत राजेश्वर कांबळे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आला.
माता रमाबाई आंबेडकर यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त रविवारी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता धम्मशील बुद्ध विहार, बेटमोगरा, ता.मुखेड जि.नांदेड येथे मातोश्री रमाबा भिमराव आंबेडकर सामाजिक सेवाभावी संस्था, बेटमोगरा, ता.मुखेड जि.नांदेड यांच्या वतीने पुरस्कार वितरण व पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष प्रकाश सोनकांबळे, सचिव भारत सोनकांबळे व पशुधन विमा अधिकार डॉ.राहुल कांबळे यांच्या हस्ते नामवंत पत्रकार तथा स्वच्छतादूत राजेश्वर कांबळे यांना २०२१ चा ‘जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, रमाई पुस्तिका, फेटा असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल सिरसे, प्रजासत्ताक पार्टीचे मुखेड तालुकाध्यक्ष मोहन गायकवाड, रिपब्लिकन सेनेचे युवा मुखेड तालुकाध्यक्ष राहुल सोनकांबळे, अॅड.तानाजी वाघमारे, प्रा.चंद्रकांत गायकवाड, आयुष्याची पाऊलवाटचे लेखक एन.जे.गायकवाड, लातूरचे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष लहु शिंदे, लातूरचे साप्ताहिक पुरोगामी विचारांचा विकासच्या संपादिका वैशालीताई पाटील, नांदेडचे प्रेस संपादक व पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते परशुराम केंद्रे, माजी ग्रामपंचायत सदस्या ललीताबाई सोनकांबळे आदी उपस्थित होते.
राजेश्वर कांबळे हे नामवंत व निर्भीड पत्रकार आहेत. गेल्या सतरा वर्षांपासून सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी उपेक्षित, शोषीत, दिनदलित व वंचित घटकांना न्याय मिळवून दिला आहे. याआधी त्यांना नेहरू आंतरराष्ट्रीय सामाजिक पुरस्कार व राज्यस्तरीय ‘पत्रकाररत्न’ पुरस्कार मिळाला आहे. सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल तहसीलदार व्यंकटेश मुंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुरेश जोशी, माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड, काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर, जेष्ठ पत्रकार प्रा.डॉ.गंगाधर तोगरे, सामाजिक कार्यकर्ते परशुराम केंद्रे, संयुक्त ग्रुपचे संचालक साईनाथ मळगे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अरविद फिसके, सर्पमित्र सिध्दार्थ काळे, औषध निर्माण अधिकारी दिलीप कांबळे, शिवकुमार भोसीकर, त्र्यंबक भोसीकर, प्रसिद्ध छायाचित्रकार विनोद महाबळे, मरशिवणी ग्रामपंचायतीचे सदस्य वैजनाथ गिरी, चंद्रकांत ढवळे, शेख शादुल, सय्यद हबीब आदींनी अभिनंदन केले.
Video News——****