कंधार येथे महर्षी मार्केडेय जयंती उत्साहात साजरी


कंधार, दि.१४- येथील महाराज गल्लीतील रमाकांत ताटीकोंडलवार यांच्या निवासस्थानी श्री महर्षी मार्केडेय यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.


प्रारंभी प्रा. मारोती चामलवार यांनी पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री महर्षी मार्कंडेय यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच उपस्थित सर्व समाज बांधवांनी पुष्पहार व पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी समाजाचे ज्येष्ठ नागरिक तथा माजी अध्यक्ष बालाजी चन्नावार, परमेश्वर बोड्डावार, कंधार/लोहा तालुका पद्मशाली समाजाचे अध्यक्ष बालाजी दारनलवार, लोहा येथील युवा अध्यक्ष बालाजी ईरमलवार, धनंजय गुंडाळे दिपक कोंपलवार, रमाकांत भंडारवार, धोंडिबा बोड्डावार, सुर्यकांत झुंझूरवार, सुर्यकांत यमलवार, माधव उडतेवार, व्यकंट झुंझूरवार, चंद्रकांत बोड्डावार, जयप्रकाश ताटीकोंडलवार, आदित्य सुर्यकांत कोमलवार आदी उपस्थिती होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *