आंबेसांगवी ग्रामपंचायतवर महिला राज ;सरपंच पदी धोंडूबाई माधव डुबे तर उपसरपंच पदी सविता विक्रम कदम यांची बिनविरोध निवड.

लोहा/ प्रतिनिधी

आंबेसांगवी ग्रामपंचायत निवडणूक २०२१ नियोजित मतदान दिनांक १५ जानेवारी रोजी आंबेसांगवी येथील ग्रामविकास पॅनलचे ७ पैकी ६ सदस्य भरगोस मतांनी निवडून आले.परंतु शासनाच्या निर्णयानुसार सरपंच पदी महिला अनुसुचित जाती प्रवर्गातील महिला दावेदार असल्याने, दिनांक १० फेब्रुवारी रोजी सरपंच पदासाठी धोंडूबाई माधव डुबे यांची बिनविरोध निवड घोषित झाली तर उपसरपंच पदासाठी सविता विक्रम कदम यांची यांची निवड घोषित झाली.

शासनाचे प्रतिनिधी/कर्मचारी म्हणून नायब तहसीलदार देवराये व आंबेसांगवी येते कार्यरत असलेले ग्रामसेवक लाठकर हे उपस्थित होते.निवडून आलेल्या ६ सदस्यांपैकी सरपंच व उपसरपंच व उर्वरित विजयी ४ उमेदवार श्री.गणपत कदम सौ.संताबाई उमरेकर सौ.मथुराबाई पांचाळ श्री.बालाजी पांचाळ या सर्व सदस्याचे नायब तसिलदार देवराये व उपस्थित आंबेसांगवी ग्रामस्थांनी स्वागत केले.
सरपंच व उपसरपंच पदाची निवड झाल्या नंतर आंबेसांगवी गावचे प्रेरणास्थान रुद्रप्पा महाराज यांनी सरपंच व उपसरपंच पदी निवड झालेल्या व ग्रामविकास पॅनलच्या सर्व
विजय उमेदवाराना आशीर्वादरुपी शुभेच्छा दिला.
विक्रम कदम सर गणपत पा.कदम व गंगाधर पा.कदम यांनी ग्रामविकास पॅनलची धुरा खंबीर पणे सांभाळून आपली सत्ता स्थापित केली.
ही निवड घोषित करताना,
मरिबा डुबे, परमेश्वर कदम, विष्णु उमरेकर,
रमेश कदम,सोपान कदम, नामदेव कदम, गजानन कदम,सुदाम उमरेकर,
सुरेश डुबे,
मारोती कदम,भागवत सावंत,गोविंद कदम, अंकुश कदम,ज्ञानेश्वर उमरेकर,
साहेबराव सूर्यवंशी, ज्ञानेश्वर डुबे,उद्धव डुबे,
बाबासाहेब सूर्यवंशी उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *