कंधार ; प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेशउपाध्यक्षा सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१६ फेब्रुवारी रोजी कंधार तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात ३५ महिलांना संघटनेची जबाबदारी देण्यात आली. यावेळी महिला मोर्चाच्या जिल्हाअध्यक्षा चित्ररेखाताई गोरे,महिला मोर्चाच्या,ओबीसी महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा वनजे ताई ,एससी महिला मोर्चा तालुका अध्यक्ष वंदना डुमणे सह महिला पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.