सार्वजनिक शिवजन्मोत्सव फुलवळ च्या वतीने शालेय विद्यार्थ्यासाठी सामान्यज्ञान स्पर्धा..

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

अखंड हिंदुस्थान चे दैवत , हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फुलवळ येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव मंडळ च्या वतीने येथीलच श्री बसवेश्वर विद्यालयातील इयत्ता ५ वी ते ९ वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी शिवचरित्र व सामान्यज्ञान या विषयावर ५० गुणांची स्पर्धा परीक्षा ता. १७ फेब्रुवारी रोजी याच शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती त्यात बहुसंख्य विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला होता.

प्रथमतः शाळेचे मुख्याध्यापक बी. एन . मंगनाळे , पत्रकार धोंडीबा बोरगावे , सागर मंगनाळे , नवनाथ बनसोडे , यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवरायांना अभिवादन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

सदर स्पर्धा परीक्षा ही ५० गुणांची असून त्यात पन्नास च प्रश्न असतील , त्यापैकी ३० प्रश्न हे शिवचरित्र वर तर २० प्रश्न हे सामान्य ज्ञानावर असणार आहेत. ही परीक्षा एक तासात पूर्ण होणार असून या परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांला राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था चे अध्यक्ष धोंडीबा बाबाराव बोरगावे यांच्या वतीने ११११ रु रोख रक्कम व शिवचरित्र पुस्तक भेट देण्यात येणार आहे , द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांला सामाजिक कार्यकर्ते नवनाथ बनसोडे यांच्या वतीने ७७७ रु रोख रक्कम व शिवचरित्र देण्यात येणार आहे तर तृतीय क्रमांकावर येणाऱ्या विद्यार्थ्यांला गजानन भांडी सेंटर चे मालक दत्ता डांगे यांच्याकडून ५५५ रु रोख रक्कम व शिवचरित्र भेट देण्यात येणार आहे. असे सार्वजनिक शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने कळवण्यात आले असून सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण हे ता. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती च्या दिवशी सागर मल्टिसर्व्हिसेस फुलवळ येथील आयोजित कार्यक्रमात होणार असल्याचे ही सांगण्यात आले.

सदर स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी श्री बसवेश्वर विद्यालयातील सर्व शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

आयोजित स्पर्धा व शिवजन्मोत्सव कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सागर मंगनाळे , शुभम फसमले , विलास सोमासे , साईनाथ शेंबाळे , विनायक पोतदार , विजय गोधणे , गौस शेख , नबीसाब शेख , बाळू वडजे व मित्रमंडळ हे नियोजनबद्ध आखणी करून परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *