लोहा; प्रतिनिधी.शिवराज दाढेल लोहेकर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व लोहा पालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते पंचशील कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
शहरातील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून व काँग्रेस पक्षाचे लोहा पालिकेतील गटनेते पंचशील कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या आशाताई श्यामसुंदर शिंदे व सेवानिवृत्त सनदी अधिकारी तथा सिने अभिनेता अनिल मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना नगरसेवक पंचशील कांबळे म्हणाले, आता हळूहळू संपूर्ण जग कोरोनातून सवरतेय मध्यंतरात कोरोनामुळे रक्तदान शिबिर सारखे समाजपयोगी कार्यक्रम बंद होते. आजघडीला जवळपास अनेक रक्तपेढ्या मध्ये रक्तांच्या पिशव्यांचा तुटवडा भासतोय, तो तुटवडा दूर करण्यासाठी प्रत्येकाने रक्तदान दिले पाहिजे त्यामुळे कुणाचा तरी जीव वाचेल. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. निसंकोचपणे प्रत्येकाने रक्तदान करावे.
सदर शिबिरात 105 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कार्यक्रमास पालम नगरपंचायतीचे नगराध्यक्ष जालिंदर हत्तीअभिरे, लोह्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी, नांदेड मनपाचे नगरसेवक मंगेश कदम, लोह्याचे माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंत पवार, अँड. कपिल सोनकांबळे, भीमकीर्तिराज कलंबरकर, देऊळगावचे सरपंच मारोती सोनवळे, पारडी चे सरपंच राम पवार, धानोरचे सरपंच सुरेश पाटील पवार, माळाकोळीचे उपसरपंच अरुण सोनटक्के, आदींची उपस्थिती होती. रक्त संकलनासाठी गुरू गोविंदसिंगजी रक्तपेढी च्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यशस्वीतेसाठी अभि वाघमारे, भैय्यासाहेब वाघमारे, सोनू दातार, कपिल साबळे, टायगर ढवळे, शेख सोहेल, गोविंद रायबोले, ग्यानोबा बुद्धे, कुणाल कांबळे, शेख बबलू, धम्मा कांबळे, शुभम ढवळे आदींनी परिश्रम घेतले.