अखंड हिंदुस्थान च्या दैवताला फुलवळ येथे ठिकठिकाणी अभिवादन..

फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )

अठरा पगड जाती-धर्माला एकत्रित घेऊन मावळे ही समान पदवी देत पर नारी ला मातेसमान दर्जा देण्याची शिकवण देणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फुलवळ येथे ठिकठिकाणी प्रतिमेचे , पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

प्रथमतः येथील सागर मल्टिसर्व्हिसेस फुलवळ येथे शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून सामुदायिक अभिवादन करण्यात आले , यावेळी पत्रकार धोंडीबा बोरगावे ,विकास पवार , रंगनाथ पांचाळ , सौरभ बोरगावे , नागेश मंगनाळे , गजानन डांगे , सागर मंगनाळे , आनंद पवार , दत्ता डांगे , धम्मानंद जाधव , नवनाथ बनसोडे , शादुल शेख सह अनेकांची उपस्थिती होती.

यानंतर जि. प.कें. प्रा.शाळेत शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बालाजी केंद्रे , शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष नागनाथ गोधणे , सरपंच विमलबाई मंगनाळे , उपसरपंच तुळशीदास रासवंते , कामाजी मंगनाळे , नामदेव कपाळे , नागनाथ मंगनाळे पत्रकार मधुकर डांगे , विश्वांभर बसवंते सह अनेकांची उपस्थिती होती.

ग्राम पंचायत कार्यालयात छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तेंव्हा सरपंच विमलबाई मंगनाळे , उपसरपंच तुळशीदास रासवंते , ग्राम पंचायत सदस्य प्रवीण मंगनाळे , श्रीकांत मंगनाळे , बालाजी देवकांबळे , मनोहर जाधव , हिरकांत मंगनाळे , इस्माईल शेख , फकिरसाब शेख सह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *