कंधार नगरपालीकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अभिवादन

शिवरायांना नगरपालीकेच्या वतिने मुजरा

कंधार ; प्रतिनिधी


बहुजन प्रतिपाळ, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने कंधार नगरपालीकेच्या कार्यालयात नगराध्यक्षा शोभाताई अरविंदराव नळगे यांनी प्रतिमेचे पुजन केले. तद्नंतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे,विर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दही-दुधाने अभिषेक, पुजन व पुष्पहार नगराध्यक्षा शोभाताई अरविंदराव नळगे यांनी केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष अरविंदराव नळगे, माजी नगराध्यक्ष रामराव पवार,लोहा-कंधार विधानसभा संघटक गणेश कुंटेवार, नगरसेवक शहाजी नळगे,डाॅ. दिपक बडवणे,नगरसेविका वर्षाताई गणेश कुंटेवार यांच्या सह शहरातील प्रतिष्ठित नागरिक व न. पा. कर्मचारीवृंद सोशल डिस्टसेन्सचा वापर करत शिवरायांना अभिवादन केले.शेवटी सभागृहात कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र ठेवरे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *