सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांना यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या वतीने ”युवा वॉरियर्स” पुरस्कार प्रदान

कंधार ; प्रतिनिधी

पुणे येथे सकाळ माध्यम समूह यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या वतीने ”युवा वॉरियर्स” पुरस्कार भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर यांना त्यांच्या सामाजीक, राजकीय व शैक्षणीक कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री श्री विश्वजीत कदम , राज्यमंत्री आदितीजी तटकरे,पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश,दिग्दर्शक ,अभिनेते प्रवीण तरडे , डॉ. महेंद्र जी कल्याणकर आयुक्त ,सकाळ माध्यम समूह अध्यक्ष प्रतापराव पवार,श्रीरामजी पवार, गायकवाड साहेब व अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा ,सामाजीक कार्यकर्त्या तथा जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर यांना त्यांच्या सामाजीक, राजकीय व शैक्षणीक कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *