गऊळ येथे शिवजयंती साजरी;सुरक्षित अंतर व मास्कचा केला अवलंब

कंधार: प्रतिनिधी


कंधार तालुक्यातील गऊळ येथे कोरोनाच्या नियमाचे पालन करून शिवजयंती साध्या पद्धतीने परंतु उत्साहात साजरी करण्यात आली. अशा परिस्थितीतही सुरक्षिततेची काळजी घेऊन व सुरक्षित अंतर ठेवण्यात आले होते.


प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष हानमंत केशवराव पाटील तेलंग व उपाध्यक्ष श्रीनिवास हनुमंत पाटील तेलंग यांनी अभिवादन केले.
यावेळी त्यांच्यासोबत ग्रामपंचायत कार्यालय गऊळ मधील सर्व पदाधिकारी, सरपंच संभाजी शामराव पाटील तेलंग, उद्धव गुट्टे उपसरपंच, ग्रामसेवक कलाळे, ग्रा.प. सदस्य गंगाधर वडजे, विजय रंगवाड, धनाजी देवकांबळे, संजय शिवाजी पा. तेलंग, न्हणू गुट्टे, शरद पा. तेलंग, रामप्रभू रंगवाड,मंगेश गीरे, अजय जायभाये,सुभाष गीरे सर, संतोष पा. गीरे, भगवान पा. गीरे, शिवानंद तेलंग ( आर्मी) शंकर तेलंग,चांदू देवकांबळे, कृष्णा तेलंग, ऋतिक जाधव,राहुल रंगवाड, नागनाथ हेंडगे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *