खरंतर आयुष्यात अशा अनेक व्यक्ती असतात ज्यांच्या विचारांमधून, वागणुकीतून काही ना काहीतरी आपण शिकत असतो. असेही अनेक व्यक्तिमत्व असतात ज्यांची नुसती कौतुकाची थाप आपल्याला प्रेरणादायी ठरत असते. अशीच एक व्यक्ती ज्यांनी दिलेले प्रोत्साहन खरच माझ्यासाठी नेहमीच मोलाचे आहेत.ती म्हणजे कै. मारोती आनंदराव डांगे
कंधार-लोहा तालुक्यातील राजकीय परिस्थिती वर सडेतोड लिखाण करून संबंध राजकारणाचा सखोल अभ्यास असणारे व्यक्तीमत्व म्हणून स्व. मारोतराव डांगे सुपरिचित होते त्यांच्या चौफेर लिखाणामुळे ते सदैव आठवणीत राहतील. त्यांचे लिखाण राजकीय परिस्थीवर मार्मिक भाष्य करण्याबरोबर समाजाला दिशा देणारे होते. कंधार, लोहा तालुक्यातील प्रत्येक गाव आदर्श व्हावं व पुढे जावं असा त्यांचा ध्यास होता. त्यामुळे ते कधी लिखाणातून तर कधी प्रत्यक्ष भेटीतूनही हा मुद्दा पुढे घेऊन जात असे. साहित्य, कला-कृती, संस्कृती, शेतीवर त्यांनी प्रचंड प्रेम केले होते. त्यांचा सहवासात मी त्यांच्याशी याच विषयात चर्चा करत असत. त्यांना राजकारणाचा सखोल अभ्यास असल्यामुळे अनेक मोठे नेते त्यांचे मत घेत असे. तसेंच त्यांच्या लिखाणातून अनेक नेत्यांची झोप देखील मी उडालेली मी पाहिली होती. स्व. मारोती डांगे यांनी बऱ्याच पत्रकार संघटनेशी एकरूप होऊन कामे केली, मने जिंकली त्यात नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघांचे सदस्य, कंधार तालुका मराठी पत्रकार संघांचे उपाध्यक्ष, उस्माननगर ग्रामीण मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष, शैक्षणिक क्षेत्रात त्यांची जिल्हा परिषेद प्राथमिक शाळा शिराढोण शालेय समिती उपाध्यक्ष, सामाजिक क्षेत्रात तंटामुक्ती उपाध्यक्ष शिराढोण अशा विविध पदांचा अनुभव घेतला होता. त्यांनी या सर्व क्षेत्रात काम कारतेवेळेस बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले यामध्ये समाज भूषण पुरस्कार अन्य संपूर्ण आयुष्य त्यांनी पत्रकारितेसाठी घालविले. स्व. मारोती डांगे स्वभावाने शांत, सरळ आणि मितभाषी होते. पत्रकारितेत आक्रमक आणि संयमी असे दोन प्रकार साधारणपणे आढळून येतात. स्व. मारोती डांगे यांची पत्रकारिता म्हणजे सोम्या आणि संयमी होती. पण ठोस अशीच होती. त्यांच्या पत्रकारितेचे चाहते कंधार लोह्या सह संपूर्ण नांदेड जिल्ह्यत मोठया प्रमाणावर होते. पत्रकारितेत धडपडणाऱ्या सर्वांसाठी, मग तो नवखा पत्रकार असो कि अनुभवी माध्यमांच्या सद्याचा युगात हा गुण अत्यंत दुर्मिळ झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्याजवळ असलेले विचारधन पत्रकारितेत धडे गिरवणाऱ्या अनेकांना मुक्तहस्य देणारा मारोती डांगे यांच्या सारखा पत्रकार विरळच.
स्व. मारोती डांगे यांचा जन्म 7मार्च 1974साली एका गरीब कुटुंबात कंधार तालुक्यातील शिराढोण येथे झाला त्यांचे वय वर्ष 3असतेवेळेस अचानक त्यांचे वडील छत्र हरवले, त्यानंतर स्व. मारोती डांगे यांच्यासोबत त्याची आई निलाबाई डांगे, मोठी बहीण शिवानंद मंगनाळे, छोटी बहीण महानंदा सोनटक्के त्यांचा विचाराने 9वि पर्यंतचे शिक्षण भीमाशंकर विद्यालय शिराढोण येते झाले तर 10ते 12शिक्षन हे शिवाजी हायस्कूल कंधार येथून पूर्ण केले. त्यानंतर ते पदवीचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी ग्रामीण भागातून पायरकारितेला सुरवात केली त्यांनी सुरवातीला दै. लोकाशा वृत्तपत्रात काम केले त्यानंतर अशा अनेक छोट्या मोठया एकजूट, आनंदनगरी, आंदोलन, देशोन्नती अशा अनेक वृत्तपत्रात काम करून समाजाचे प्रश्न मार्गी लावले. असा अभ्यासू पत्रकार काळाच्या पडद्याआड गेला तरी त्यांच्या लिखाणातून ते कायमस्वरूपी सर्व पत्रकारांसाठी प्रेरणादायी असतील.