मतदारसंघातील 16 बिनविरोध ग्रामपंचायतींना आ. शिंदे यांच्या हस्ते 80 लक्ष रुपये निधीचे पत्र वाटप
कंधार (प्रतिनिधी)
नुकत्याच पार पडलेल्या लोहा, कंधार मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये लोहा, कंधार मतदार संघातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध काढून गावा -गावात कायम शांतता व सामाजिक सलोखा अबाधित राहावा म्हणून मतदार संघातील गावकऱ्यांनी बहुसंख्येने ग्रामपंचायती बिनविरोध काढण्याचे नम्र आवाहन लोहा- कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय,कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी केले होते, आ. शिंदे यांच्या ग्रामपंचायती बिनविरोध काढण्याच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद देला.
लोहा तालुक्यातील अंतेश्वर, रायवाडी, सोनमांजरी, सुगाव, भारसावडा, टाकळगाव, बोरगाव (की.) अशा एकूण सात ग्रामपंचायती बिनविरोध काढण्यात आल्या होत्या तर कंधार तालुक्यातील भोजुचीवाडी, मजरे धर्मापुरी, वंजारवाडी, चौकी महाकाय, गोगदरी ,तेलंगवाडी, तेलुर, संगमवाडी ,नवघरवाडी अशा लोहा ,कंधार मतदार संघातील एकूण 16 ग्रामपंचायती आ. शामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे यांच्या आवाहानानुसार बिनविरोध काढण्यात आल्या होत्या, आ.शिंदे यांनी मतदार संघातील बिनविरोध निवड झालेल्या ग्रामपंचायतींना आमदार निधीतून तात्काळ पाच लक्ष रुपयांचा निधी व शासनाचा पाच लक्ष रुपयांचा निधी असा एकूण दहा लक्ष रुपयांचा निधी बिनविरोध ग्रामपंचायतीला देण्याची घोषणा केली होती, शनिवार दि. 20 फेब्रुवारी रोजी आ. शिंदे यांच्या वसंत नगर येथील स्मेरा निवासस्थानी लोहा -कंधार तालुक्यातील 16 बिनविरोध निघालेल्या ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा एका छोटेखानी कार्यक्रमात नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करून प्रत्येक बिनविरोध ग्रामपंचायतीच्या सरपंचांना पाच लक्ष रुपयांच्या निधीचे पत्र आ.श्यामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले,
यावेळी बोलताना आ. शिंदे म्हणाले की, आगामी काळात मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असून लोहा-कंधार मतदारसंघाला नांदेड जिल्ह्यात मॉडेल बनवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, येणाऱ्या काळात मतदार संघातील सर्व ग्रामपंचायतीला रस्ते ,पाणी, शिक्षण ,आरोग्य, कृषी ,रोजगार उपलब्धतेसाठी निधीची कमतरता भासू देणार नसून मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रालय स्तरावरून भरघोस निधी खेचून आणण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचेही आ. शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. लोहा व कंधार तालुक्यातील एकूण 16 बिनविरोध ग्रामपंचायती बिनविरोध निघून आमदार शामसुंदर शिंदे यांच्या ताब्यात आल्या असून ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये बिनविरोध ग्रामपंचायतींना पाच लक्ष रुपये निधी तात्काळ देण्याचा शब्द काल शनिवारी आमदार शामसुंदर शिंदे यांनी पूर्णत्वास नेल्या मुळे उपस्थित बिनविरोध ग्रामपंचायतीच्या सरपंच व सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी आमदार शामसुंदर शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांचे आभार व्यक्त केले,
यावेळी या कार्यक्रमास जिल्हा नियोजन समिती सदस्य रावसाहेब पाटील शिंदे,जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील ,जिल्हा परिषद सदस्य हंसराज पाटील बोरगावकर ,खरेदी-विक्री संघाचे उपसभापती शाम अण्णा पवार, संदीप पाटील उमरेकर, भास्करराव पाटील जोमेगावकर, युवा नेते रोहित पाटील शिंदे सह नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व ग्रा.प. सदस्य सह कार्यकर्ते सामाजिक अंतराचे पालन करत उपस्थित होते.