कंधार ; प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्ष बळकट करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी आढावा बैठकीचे आयोजन केले जात आहे.शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अजीत दादा पवार ,जयंत पाटील ,कमलकिशोर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हात राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न चालु असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर यांनी दिली.
कंधार येथे दिनांक 20 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आली.या आढावा बैठकीचे अध्यक्ष माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस वसंत सुगावे ,जिल्हाध्यक्ष ग्रंथालय विभाग संतोष दगड गावकर, माजी सभापती जि प नांदेड संजय पाटील कराळे ,कंधार लोहा नेते रामचंद्र येईलवाड आदीसह मान्यवरांची उपस्थिती होती.
जयंत पाटील यांनी पक्षसंघटन मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यात संवाद यात्रेच्या माध्यमातून दौरा करत आहेत .प्रत्येक तालुक्यामध्ये पक्ष मजबूत झाला पाहिजे म्हणून सर्व आघाड्यावर बैठका असून महिलांचा सहभाग वाढवणे,विद्यार्थी ,युवकासह सर्वच क्षेत्रातील सहभाग पक्षात वाढवण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष प्रयत्न असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
गौतम ग्यानोबा बनसोडे,बालाजी पाटील करमाळेकर,प्रविण मारोतराव मंगनाळे रा.करमाळा यांनी आज या आढावा बैठकीत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी माजी जि.प.सदस्य मोहन पाटील शिरसाट ,विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बाबूराव केंद्रे ,जिल्हा अध्यक्ष विद्यार्थी आघाडी श्रीकांत मांजरमकर, महिला अध्यक्ष प्रांजली ताहेर आवलगावकर ,कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस सचिन जाधव, बाबूराव केंद्रे ,शिवदास धर्मापुरीकर , राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष माधव पाटील मोरे ,शहराध्यक्ष राजकुमार केकाटे,शत्रू महाराज स्वामी, हनुमंतराव खेडकर ,डी.आर बनसोडे ,प्रल्हाद पाटील फाजगे,रेखा अहिरे ,श्रीसागर ताई ,नारायण घोरबांड, परसराम कदम ,आमीन भाई ,तनवीर भाई आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार एडवोकेट अंगत केंद्रे यांनी केले.