कोव्हीड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंधार नगरपालीकेच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने मुख्याधिकारी यांचा आदेश

कंधार ; प्रतिनिधी

अध्यक्ष,कोचिंग क्लासेस, खाजगी शाळा, विद्यालय, महाविद्यालय, हॉटेल, कापड दुकान, किराणा दुकान,
मंगल कार्यालय, मंदीर, व्यायाम शाळा व इतर आस्थापना कंधार.

विषयः कोव्हीड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या
अनुषंगाने पारीत केलेले आदेश, निर्देश, SOP इत्यादींचे प्रभावी अंमलबजावणी
बाबत.

संदर्भः मा.जिल्हाधिकारी, नांदेड यांचे परिपत्र क्र.2021/मशाका/आ.व्य./काविदिनांक 17/02/2021

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, कोराना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
प्रतिबंधात्मक उपाययोजना दुसरा भाग म्हणून नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी नांदेड
जिल्ह्यातील मंगल कार्यालय, कोचिंग क्लासेस, खाजगी शाळा, अनुदनीत व विना अनुदानीत शाळा/विद्यालये,
महाविद्यालये, हॉटेल, रेस्टॉरंट, व्यायामशाळा, धर्मीक स्थळे व इतर गर्दी होणारी स्थळे इत्यादी ठिकाणी
नागरीकांनी मास्कचा नियमीत वापर तसेच सदर ठिकाणी सॅनिटायझर, हॅन्डवॉशची व्यवस्था व सोशल
डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे असे मा.जिल्हाधिकारी महोदय यांचे संदर्भात परिपत्रकान्वये
आदेशित करण्यात आले आहे.

त्या अनुषंगाने सदरीची कोरोना विषाणूची दुसरी लाट लक्षात घेता कंधार शहरातील आपणांकडे चालू
असलेले आस्थापना, कोचिंग क्लासेस, खाजगी शाळा, अनुदानीत शाळा, विद्यालये, महाविद्यालये, हॉटेल,
रेस्टॉरंट, व्यायामशाळा, भाजी मंडई/भाजी पाला टुकाने येथे येणारे ग्राहकानागरीका विद्यार्थी यांची गर्दी होणार
नाही तसेच नागरीकांनी मास्कचा नियमीत वापर करतील याची दक्षता घ्यावी व सदर ठिकाणी
नागरीकांकरिता/विद्यार्थ्यांकरिता सॅनिटायझर व हॅन्डवॉशची व्यवस्था करावी तसेच त्यांच्या मध्ये कमीत कमी
01 मीटर चे अंतर ठेवावे सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन होणार नाही याची गांभिर्याने दक्षता घ्यावी.

तरी मा.जिल्हाधिकारी महोदयांच्या उपरोक्त आदेशाचे उल्लंघन झाल्यास आपणावर कायदेशिर
कार्यवाही करुन आपणांवर दंडात्मक कार्यवाही केली जाईल व पुढील आदेशापर्यंत आपली आस्थापना सिलबंद
करण्यात येतील याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *