नांदेड ; प्रतिनिधी
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे, दिनांक ०८ डिसेंबर २०२० रोजी. संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मा. श्री. पी. बी. खपले अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी ( उच्च निवड श्रेणी ) जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड यांच्या हस्ते संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले..!
आणि मा. श्री. पी. खपले बोलताना म्हणाले संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी. महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई माथाबाई हे विठ्ठलभक्त होते, त्यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. तेल्याचे घर असल्यामुळे मुलांला हिशोब करता येणे गरजेचेच असते त्यामुळे संताजी महाराजांना देखील लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते. घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. कीर्तनाला, भजनाला जाण्याची सवय लागली. कीर्तनाची आवड त्यांच्यात बालपणीच निर्माण झाल्यामुळेच ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्या पैकी एक झाले. अश्या महान महापुरुषाची आणि त्यांच्या कार्याची आपल्याला जाणं असणं गरजेचे आहे. असे ही मा. श्री.पी बी. खपले यांनी मत व्यक्त केले..!
मा. श्री. आ. ब. कुंभारगावे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालयात संत जगनाडे महाराज यांची जयंती. साजरी करण्यात आली..!
यावेळी,श्री. एस. एस. केंद्रे, पोलिस निरीक्षक, श्री. एस. जे. रणभीरकर, व्ही. बी. आडे, ए. एम.झंपलवाड, श्री. बी. एम. शिरगिरे, साजिद हासमी, शिवाजी देशमुख, वैजनाथ मुंडे, संजय पाटील, सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे, ओमशिवा चिंचोलकर, शंकर होणवडजकर, अमोल वाकडे, सुनील पतंगे, मोसीन शेख, अनिकेत वाघमारे यांची उपस्थिती होती..!