कंधार —-शेख शादुल
नांदेड मार्ग उस्मान नगर ते बहादरपुरा मार्ग फुलवळ ते जांब राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम फार जोमाने चालू आहे या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये आले असून या राष्ट्रीय महामार्ग वरील अनेक गरिबाचे घरे पाडून रुंदी ज्यात घेतली आहे तर काही ठिकाणी रुंदी कमी करून काही लोकांचे घरे वाचण्याचे काम राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे गुत्तेदाराचे काम लईच भारी अधिकाऱ्यांचे झाले गुत्तेदार कारभारी अशी म्हणण्याची वेळ नागरिकांना येत आहे ,
या राष्ट्रीय महामार्ग वरील गुप्ते दारांच्या व अधिकाऱ्यांच्या हाताला धरून या राष्ट्रीय महामार्ग रुंदी नेमकी किती फुटाची हे मात्र ना गुत्तेदाराला माहित आहे ना वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती आहे नेमके या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची रुंदी नेमके किती फुटाची हे मात्र ना वरिष्ठ अधिकारी सांगतात ना गुत्तेदार सांगतात या दोघांच्या मनमानी कारभारामुळे अनेक गरिबांची घरे उद्ध्वस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळते.
बहादरपुरा ते फुलवळ मार्ग जांब या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची रुंदी काही ठिकाणी 50 तर काही ठिकाणी 80 तर काही ठिकाणी 70 नेमकी या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याची रुंदी किती फुटाची या गुप्ते दाराच्या व अधिकाऱ्यांच्या सहमतीने या राष्ट्रीय महामार्ग वरील रस्त्याचे काम सुरू आहे या मार्गावरील काही ठिकाणी टन कसल्याच प्रकारे झिरो न करता या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली असल्याचे बोले जात आहे ,
उस्माननगर, लालवाडी ,फुलवळ महादेव मंदिर दिग्रस, हरबळ, या अनेक गावातील बस स्टँड वरील या टन मुळे अनेक घटना होऊ शकतात या घटना होण्याअगोदरच या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या कामाचे गुत्तेदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेक वेळा फुलवळ च्या नागरिकांनी तोंडी सांगूनही याकडे व नागरिकांच्या बोलण्याकडे गुत्तेदार व वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्या कारणामुळे या दोघांच्याही मनमानी कारभारामुळे येणाऱ्या काळामध्ये या फुलवळ टर्न वर घटनेचे जिमेदार अधिकारी असतील असही नागरिकांतून बोलले जात आहे ,
या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या कामाकडे व गुत्तेदाराच्या व अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारा कडे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री व बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, लोहा कंधार मतदार संघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे, नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, लातूर लोहा कंधार या मतदारसंघाचे खासदार या सर्व राजकीय नेत्यांनी होत असलेल्या रस्त्याच्या कामाची चौकशी करून गुत्तेदार व या रस्त्याच्या कामामध्ये काही अधिकारी सामील आहेत या अधिकाऱ्यावर कारवाई करून या होणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम नियमाने व्हावे अशी मागणी गरीब जनता करत आहे.