फुलवळ ; धोंडीबा बोरगावे
कंधार तालुक्यातील फुलवळ येथील एका ५० वर्षीय विवाहित महिलेने स्वतःच्या घरात छताला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याने गावात शोककळा पसरली आहे.
सदर मयत महिलेच्या पश्चात पती, दोन मुल ,दोन सुना, व नातू असा मोठा परिवार आहे.
दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ रात्री १२.३० ते सकाळी ६ वाजताच्या सुमारास लक्ष्मीबाई गोविंद शेळगावे वय ५० वर्षे, धंदा घरकाम या विवाहित महिलेने स्वतःच्या घरामध्ये छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आणि ता. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ती घटना निदर्शनास आली .
यावरून फुलवळचे पोलीस पाटील इरबा देवकांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंधार पोलीस ठाणे अकस्मत मृत्यू ८/२०२१ अशी नोंद करून पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.मधुकर गोंन्टे हे पुढील तपास करत आहेत.