माळाकोळी ;एकनाथ तिडके
माळाकोळी परिसरातील चिंतामणी मंदिर परिसर शिवार तसेच लांडगेवाडी शिवार येथील शेतात आग लागल्यामुळे व ती पसरत गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे,जनावरांचा चारा, दुबार वेचणीचा कापूस, रब्बी पिके व इतर पिके यांचे नुकसान झाले आहे. आगीचे वाढते स्वरूप पाहता ग्रामस्थ व प्रशासनाने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.
दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दुपारी अचानक माळाकोळी परिसरातील पूर्व व दक्षिण भागातील शिवारात आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांची एकच धावाधाव सुरू झाली , संपूर्ण शिवारात आग मात्र झपाट्याने पसरत होती अनेक शेतकऱ्यांचा दुबार पेरणी चा कापूस रब्बी पिके जनावरांचा चारा , झाडे क्षणार्धात जळून खाक झाली , सदर आग पसरत खेडकरवाडी शिवार, मस्की शिवार अशी वाढतच जात होती आगीचे वाढते स्वरूप पाहता सरपंच प्रतिनिधी मोहन प्रकाश वर यांनी तहसीलदार लोहा यांना संपर्क केला अग्निशामक यंत्रणा गावात आली मात्र आग लागलेल्या ठिकाणी अग्निशामक वाहन जाऊ शकत नसल्यामुळे आग आटोक्यात आणणे अवघड जात होते , रात्री दोन वाजेपर्यंत आटोक्यात आली नाही संपूर्ण गाव व नागरिक आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते.
आग लागल्याचे समजताच माळाकोळी ते सरपंच प्रतिनिध मोहन काका शूर, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी जनार्धन तिडके,उपसरपंच निखिल मस्के, दत्ता चाटे, संतोष केंद्रे, वैजनाथ चाटे, ज्ञानेश्वर तिडके रवी चाटे, मनोज मुंडे माधव मुसळे सदानंद पांचाळ गणेश शिंदे अक्षय चाटे , सुरज चाटे यांच्यासह इतर नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहून प्रयत्न केले.या आगीत शेकडो हेक्टर जमिनीवरील दुबार पेरणी चा कापूस रब्बी पिके जनावरांचा चारा जळून खाक झाला आहे यामुळे प्रशासनाने सदर नुकसानीचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत करावी अशी मागणी सरपंच वैष्णवी मोहन शूर यांनी केली आहे.
प्रशासनाची तत्परता….
माळाकोळी परिसरात लागलेली आग व तिचे वाढते स्वरूप पाहता प्रशासनानेही तातडीने यंत्रणा हलवत योग्य ती काळजी घेतली, सरपंच प्रतिनिधी मोहन काका शूर यांनी माहिती देताच जिल्हाधिकारी विपिन ईटणकर, तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी तातडीने सूत्र हलवत अग्निशामक वाहने माळाकोळी येथे पाठवली शिवाय वेळोवेळी परिस्थितीची माहिती सरपंच प्रतिनिधी मोहन शूर यांच्याकडून घेतली, माळाकोळी सज्जाचे तलाठी संदीप फड व वनविभागाचे कर्मचारी हे संपूर्ण रात्र माळाकोळी शिवारात हजर होते,
अधिकारी पदाधिकारी यांनी काढली रात्र जागून….
वणव्यासारखी आग पसरत होती शेकडो हेक्टर जमिनीवरील झाडे पिके क्षणार्धात जळून खाक झाली होती अशावेळी ही आग आटोक्यात आणण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले माळाकोळी सरपंच प्रतिनिधी मोहन काका शूर पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी जनार्धन तिडके, उपसरपंच निखिल मस्के या पदाधिकार्यांनी रात्रभर जागत हातात झाडपाला घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न केले, तर माळाकोळी सजाचे तलाठी संदीप फड व वनविभागाचे मंडळ अधिकारीश्री. एस. वाय.क्यादरवाड , श्री. एल. एन. शेळके वनरक्षक , श्री. डी. डी. मुसळे या कर्मचाऱ्यांनी संपूर्णण रात्र माळाकोळी शिवारात जागून काढली.