कंधारःमहात्मा फुले माध्य.व उच्च माध्यमिक विध्यालय, शेकापूर ता.कंधार येथे प्रल्हाद दे.आगबोटे यांनी तिन दशकापेक्षा अधिक काळ विद्यार्थ्यांना निष्ठेने प्रामाणिकपणे सेवा दिली.कर्तव्य तत्परता, आपुलकी, संस्थेवर अपार निष्ठा आदी गुणांनी आपली स्वतंत्र ओळख त्यांनी निर्माण केली.असे प्रतिपादन संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डी.एन केंद्रे यांनी सेवानिवृत्त कार्यक्रमात बोलताना केले.
प्रल्हाद आगबोटे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सपत्नीक सत्काराचा कार्यक्रम शेकापुर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विध्यालयात , आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डी.एन केंद्रे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी जि.प.सदस्य संभाजीराव पाटील केंंद्रे, प्रा.डाॅ.गंगाधर तोगरे ,प्राचार्य मोतीभाऊ केंंद्रे, पञकार अँँड.रवि कांंबळे, पर्यवेक्षक व्ही .के केंंद्रे, राऊत्तखेडा येथील माजी उपसरपंच विलासराव आगबोटे, इंजि. रवि आगबोटे, प्रा.मुंजाजी शिंदे, प्रा.केशवराव कागने,उपप्राचार्य एस.आर पांचाळ,प्रा.एम.टी कांबळे,कमलाकर नागरगोजे,किरण आगबोटे, डी.पी जायभाये आकाश आगबोटे,मनोज आगबोटे, वैभव आगबोटे आदीची उपस्थिती होती. अध्यक्ष व प्रमुख पाहुने यांच्या हास्ते प्रल्हाद आगबोटे व त्यांच्या सौभाग्यवती सौ.रंजनाताई आगबोटे यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय समारोप करताना प्रा.डी.एन.केंद्रे यानी प्रल्हाद आगबोटे यांचा संघर्षमय जीवनपट मांडला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेले यश कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.
प्रल्हाद आगबोटे अष्टपैलू व्यक्तीमत्व
-प्रा.डॉ. गंगाधर तोगरे
प्रल्हाद आगबोटे यांनी विद्यार्थी दशेपासून आर्थिक परिस्थितीचा प्रखरपणे सामना केला.हातबलता,नाउमेद हा त्यांचा स्वभाव नाही. जिद्द ,संघर्ष, आत्मविश्वासाने आपल्या कामावर निष्ठा ठेऊन त्यांनी मार्गक्रमण करून यश मिळविले. त्यांचे व्यक्तीमत्व अष्ठपैलू असून त्यांनी तिन दशकाच्या पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर ,वंचीत ,उपेक्षीतांचे प्रश्न ऐरणीवर आणून त्यातून न्याय मिळवुन देण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले, भारतीय संविधानाचे शिल्पकार ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,राजर्षी शाहू महाराज, आदी महापुरुषांचे विचार समाजात रूजविण्याचा प्रयत्न केला.असे प्रा.डॉ. गंगाधर तोगरे यावेळी बोलताना म्हणाले.
प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे यांनी आपल्या मनोगतात आगबोटे यांच्या कार्यशैलीची प्रशंसा केली.पर्यवेक्षक व्ही.के.केंद्रे यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला.सुत्रसंचालन प्रा. अरुन केदार यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर.के वरपडे,शेख एम.एम. प्रा.गुट्टे एस.टी, प्रा.गिते पी.एम. प्रा.केदार ए.बी, प्रा.बी.एम सुर्यवशी, प्रा.नागरगोजे एम.एन, माजी सरपच प्रा.डी.एम जायभाये, प्रा. गोविद आडे, कोतवाल साहेब, प्रा.नागरगोजे जी.के. प्रा.विजय राठोड.प्रा.पंकज पाटील, अनेबा मुंडे ,पञकार एस.पी केद्रे, प्रा.एच.एम भालेराव श्रीमंगले एस.आर.पडलवार सी.टी. ठोबरे किशन, मेडके एस.के. लोंड अमित, बोराळे एम .व्ही ,केद्रे एम.डी. अनिल बोईवार, बी.जी केद्रे ,मधुकर नागरगोजे,माधव कदम,गणेश केद्रे ,बाळु चेवले , आदीनी परिश्रम घेतले. तर यावेळी सौ.एस.डी ईप्पर मॅडम, प्रा.सौ.स्वाती रत्नगोले,सौ.अजिंता आगबोटे, श्रध्दा ऊर्फ राजनंदनी आगबोटे, मनोज आगबोटे ,वैभव आगबोटे, राजु वाघमारे याच्यासह मोठ्या प्रमानात विध्यार्थी,विध्यार्थीनी उपस्थित होते.आभार प्रा.डी.एम जायभाये यानी मानले.