( बिलोली ता.प्र)
बिलोली तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळेत टप्याटप्याने कोवीड-१९ च्या नियमाचे पालन करित तंबाखूमुक्त अभियान राबवून शासनाने नव्याने पारित केलेल्या नऊ निकषांची अंमलबजावणी करुन ते टोबॕको फ्री अॕपवर डाऊनलोड करुन शाळा तंबाखूमुक्त करावे असे आव्हान अल ईम्रान प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा.मोहसीन खान यांनी दि.२६ फेब्रुवारी२०२१ रोजी शुक्रवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचाळा येथे गुणवत्ता आढावा संवाद कार्यशाळेत केले.
◼️कार्यशाळेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रविंद्र अंबेकर,कृष्ण देशमुख,अभय परिहार,शिवराज पवार,गटशिक्षण अधिकारी तोटरे डी.के,शिक्षणविस्तार अधिकारी भैरवाड एस.पी,कौटकर वाय.एस,केंद्रप्रमुख माधव लोलमवाड आदिंची प्रमुख उपस्थिती होती.शाळेच्या मुख्याध्यापक,शिक्षकांनी जास्तीत जास्त टेक्नाॕलाॕजी चा वापर करावा व प्रात्यक्षिकावर जास्त भर द्यावा,दररोज गृहभेटी देणे,शिक्षक मिञ यासह शाळेत नवनविन शैक्षणिकसह ईतर उपक्रम राबवावे असे प्राचार्य रविंद्र अंबेकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.तसेच कृष्ण देशमुख,शिक्षक विठ्ठल चंदनकर,हसगुळे,वाघमारे,पटवे मॕडम यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षशिय समारोप गटशिक्षण अधिकारी तोटरे डी.के यांनी केले.या संवाद कार्यशाळेत या केंद्रा अंतर्गत मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षिका आदिं हे सामाजिक आंतर ठेवून उपस्थित होते.