जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्युएचओ)च्या सर्पदंश व्यवस्थापन तज्ञसमिती मध्ये मराठवाडा भुषण डाॅ.दिलीप पुंडे यांची निवड.

मुखेड ता. प्रतिनिधी

हजारो सर्पदंशाच्या रूग्णांना वाचवणारे मुखेड व मराठवाडाभूषण-डॅा.दलीप पुंडे यांची जागतिक आरोग्य संघटना WHO सर्पदंश व्यवस्थापन तज्ञसमिती मध्ये डाॅ. दिलीप पांडुरंग पुंडे यांची निवड झाली आहे.

‘विषाची परिक्षा पाहू नये ‘अशी म्हण मराठीत प्रसिध्द आहे त्या मुळे विष आणी त्याचा संसर्ग ज्यामुळे होतो त्या सर्पदंशाबद्दल लोकांमध्ये भीती आहे. याच सर्प दंशाबाबत लोकांमधील भिती घालवण्याचे तसेच याबाबत जनजागृती करण्याचे महान कार्य मुखेड भुषण डॅा.दलीप पांडुरंग यांनी केले आहे.

गेल्या दोन दशकांत सर्पदंशामुळे दहा लाखाहून अधिक भारतीयांचा मृत्यू झाल्याचा अभ्यास जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) यांनी करण्यात आला आहे. सर्पदंशाने नाटकीयदृष्ट्या प्रभावित झालेल्या देशांमध्ये भारत आहे. आणि जगातील वार्षिक मृत्यूच्या एकूण संख्येच्या निम्म्या भागामध्ये पण आहे. ‘राष्ट्रीय प्रतिनिधी दरवर्षी मृत्युचे दर अभ्यासात म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) सन २०३० पर्यंत सर्पदंशामुळे होणा-या मृत्यूमुळे मृत्यूंच्या निम्म्या संख्येत घट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आणि या रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण ठेवण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा या जागतिक लक्ष्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल. या साठी हजारो सर्पदंशाच्या रूग्णांना वाचवणारे, सर्पदंशाबद्दल लोकांमध्ये भीती जनजागृती, सर्पदंशा विषयावर भारतात व विदेशात ही व्याख्याने झालेले, अनेक पुरस्काराने संन्मानीत मुखेड व मराठवाडाभूषण -डॅा. दलीप पुंडे यांचे कार्यपाहुनच जागतिक आरोग्य संघटना WHO सर्पदंश व्यवस्थापन तज्ञसमिती मध्ये डाॅ. दिलीप पांडुरंग पुंडे यांची निवड झाली आहे.

या निवडी बद्दल कर्मवीर किशनराव राठोड, आमदार डॉ.तुषार राठोड, शेषेराव चव्हाण, माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड, दशरथराव लोहबंदे ( जि.प.सदस्य नांदेड) महाराष्ट्र राज्य मंत्रालयीन पशु चिकित्सक संघटनेचे राज्यध्यक्ष डॉ.राहुल कांबळे, बेटमोगरा येथील रमाई फाउंडेशन ची सर्व टीम, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मुखेड तालुकाध्यक्ष पत्रकार भारत सोनकांबळे, सचिव पत्रकार मोतीपाशा पाळेकर, कार्याध्यक्ष पत्रकार आसद भाई बल्खी, व पत्रकार संघटना, डॉक्टरर्स,कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *