कुंटूर/प्रतिनिधी-
कुंटूर ता. नायगाव,
निसर्ग हाच सर्वशक्तिमान निर्मिक आहे. तोच मानवासह सजीवांच्या जगण्याचा मूलाधार आहे. त्याचे संवर्धन हेच खरे धर्माचरण आहे. आज ज्या निर्दयपणे आपण निसर्गाचे हनन करीत आहोत ते अखिल सजीव जातीसाठी धोकादायक आहे. आपण पर्यावरणाची मोठी हानी करत आहोत. त्यामुळे संपूर्ण सृष्टीचक्रच बिघडून गेले आहे. त्याचा परिणाम वेगवेळ्या रोगराई पसरण्यात होत आहे. त्यामुळे आपण निसर्गाचे संवर्धन केले पाहिजे. आपल्या छोट्या छोट्या गोष्टीमधून निसर्गाचे संवर्धन करता येते. आपण प्रत्येकाने वर्षाला एक झाड लावून ते जगवले पाहिजे. असे प्रतिपादन साने गुरुजींची धडपडणारी मुले या चळवळीच्या ग्रीन कव्हर प्रोजेक्टचे प्रमुख युसुफ शेख यांनी केले आहे.
ते आजच्या सामुदायिक सर्वधर्म प्रार्थनेत बोलत होते. विनोद झुंजारे सरांनी सर्वधर्म प्रार्थना घेतली व सुंदर भजन सादर केले. यावेळी अंनिस शाखा कुंटूर चे अध्यक्ष ,जेष्ठ पत्रकार संजय ठिकाणे पाटील, राजेश वाघमारे, योगेश रेनगुंटवार, गोविंद महादाळे, संभाजी भालेराव, अनिल सुर्यवंशी, संभाजी भालेराव, माणिक माटकर,अंनिस शाखा कुंटूर चे प्रधान सचिव शिवाजी पाटील आडकिने, बालाजी आडकिने, डॉ. बाळू दुगडूमवार यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.