फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
मराठी पत्रकार परिषदेच्या विचाराशी एकमत असलेल्या फुलवळ मराठी पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी ची फेरनिवड नुकतीच करण्यात आली असून त्यात नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून परमेश्वर डांगे , सचिव दिगंबर डांगे तर सल्लागार पदी डॉ. प्रदीपसिंह राजपूत यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली तर सदस्य धोंडीबा बोरगावे , मधुकर डांगे , विश्वांभर बसवंते , सचिन मंगनाळे , ऍड. उमर शेख हे असतील.
गेली अनेक वर्षांपासून मराठी पत्रकार परिषदेच्या विचाराशी सहमत राहून सातत्याने कार्यशील राहून नांदेड जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा फुलवळ मराठी पत्रकार संघ , याच पत्रकार संघाची नुकतीच नूतन कार्यकारणी फेरनिवड करण्यात आली तेंव्हा येथील सर्व पत्रकार उपस्थित होते.
या फेरनिवडीत नवीन उमद्या पत्रकारांना सर्वानुमते मान्यता देण्यात आली. त्यानुसार येथील पत्रकार संघाचे अध्यक्ष , सचिव आणि सल्लागार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.