कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील फुलवळ येथिल शेत गट क्रमांक 79 मध्ये अल्पभूधारक शेतकरी पिराजी झंपलवाड यांनी सन 2014 मध्ये कोटेशन भरले मात्र अद्याप महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या वतीने वीज जोडणी केली नाही मात्र तरीही सुमारे 34 हजार 500 रुपये बिल आले.त्यामुळे विविध प्रकरणात चेर्चेत असणाऱ्या विज वितरणचा अजब कोरोभार समोर आला आहे.
उपविभागीय कार्यकारी अभियंता यांना शेतकरी पीराजी नागोराव झंपलवाड यांनी निवेदन दिले आहे. मीटरचे कोटेशन भरलेले असल्याने त्वरित मीटर बसवावे अशी विनंती केली आहे.
निवेदनात असे नमुद केले आहे की वारंवार चौकशी केली असता संबंधित कार्यालयाच्या वतीने तांत्रिक अडचण दाखवून चालढकल करण्यात आलेली आहे .शेतकऱ्यांच्या नावे एवढी मोठी रक्कम आली त्यामुळे मी आवाक झालो असून अधिकाऱ्यांनी तात्काळ माझे वीज बिल माफ करावे व तात्काळ विज जोडणी द्यावी अशी मागणी शेतकरी पिराजी झंपलवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.