कंधार ; प्रतिनिधी
सुमारे तीस वर्ष प्रशासनामध्ये सेवा करत असताना विविध पदावर प्रामाणिकपणे काम केले. तहसील कार्यालय , जिल्हाधिकारी कार्यालय या मध्ये सेवेचा दांडगा अनुभव असल्याने मी आज कंधार तहसील कार्यालयात निवडणूक नायब तहसीलदार म्हणून सेवा बजावत आहे .
निवडणूक आयोगाने नेमून दिलेल्या सूचना ,काम याचे तंतोतंत पालन करून कंधार तहसील कार्यालयात मतदान कार्ड डिजिटलायझेशन असेल ,निवडणूक याद्या सह विविध निवडणुकीची कामे प्रभावीपणे केली आहेत.
महिला दिनानिमित्त आजच्या महिलांना व तरुणींना मी असा संदेश देते की अत्यंत कमी शिकण्याचा मला अनुभव असला तरीही प्रशासनात नोकरी करण्याची संधी मिळाली, मी त्या संधीचे सोने केले आणि प्रशासनामध्ये मोठ्या पदावर आता सेवा बजावत आहे. आजच्या तरुणीने दर्जेदार शिक्षण व प्रामाणिक मेहनत आणि ध्येय ठरवून परिश्रम घेतल्यास यशाला गवसणी घालता येते असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.