ना.अशोकराव चव्हाण यांचा विकास कामांचा झपाटा सुरुच अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी 44 कोटी 71 लाख मंजूर


नांदेड – महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून ना.अशोकराव चव्हाण यांनी जिल्ह्यात विकासाचा झपाटा सुरुच ठेवला असून नर्सिंग महाविद्यालय मंजूरीनंतर येथील श्री गुरु गोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेच्या नवीन स्वतंत्र विभागीय इमारतीच्या बांधकामांसाठी 44 कोटी 71 लाख रुपये मंजूर करुन घेतले आहेत.


विकास कामात आघाडीवर असलेल्या नांदेड जिल्ह्यातील विकास कामे भारतीय जनता पक्ष सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात ठप्प झाली होती. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर ना.अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांतून जिल्ह्यात विकास कामांचा झपाटा सुुरु झाला आहे. नांदेडात ईबीसी वसतीगृह उभारण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाड्याच्या इमारतीत सुरु असलेल्या शासकीय बी.एड्.कॉलेजच्या इमारतीसाठीही साडेचौका कोटी रुपये मंजूर झाले आहेत. कांही दिवसांपूर्वीच विष्णुपूरी येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नर्सिंग कॉलेज मंजूर झाले आहे.


डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नर्सिंग महाविद्यालय मंजूर होऊन दोन दिवस उलटल्यानंतर लगेच येथील श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेच्या नवीन व स्वतंत्र इमारतीच्या बांधकामांसाठी 44 कोटी 71 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन घेण्यात आला आहे. येथील श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयास ऑटोनॉमसचा दर्जा आहे. हा दर्जा अधिक उंचावावा यासाठीच नवीन इमारतीसाठी ना.अशोकराव चव्हाण निधी मंजूर करुन घेतला आहे. या निधीतून नवीन इमारतीमध्ये तळमजला व त्यावर तीन मजल्यांचे बांधकाम केले जाणार आहे. हे बांधकाम पूर्णत्वास आल्यानंतर या संस्थेच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ होऊन विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *