कंधार : प्रतिनिधी
घोडज येथे पोहण्यासाठी गेलेल्या तिन पैकी ओम विजय मठपती याचा गत वर्षी दुर्दैवी मृत्यू झाला होता व दोन मुले कामेश्वर वाघमारे यांनी पाण्यात उडी टाकून वाचवले होते.परंतु मयत ओमचे कुटूंबीय शासनाच्या मदतीपासुन वंचीत होते.यांची दखल घेवून मयत ओम याच्या कुटुंबियांना भाजपा प्रदेश उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे चिखलीकर यांनी पाठपुरावा करत गोपीनाथराव मुंडे शेतकरी अपघाती विमा अंतर्गत २ लक्ष रुपयांची मदत जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सहकार्याने मिळवून दिली.अशी माहीती आज 3 मार्च रोजी गंगाप्रसाद यन्नावार यांनी दिली.
मागील वर्षी २२ फेब्रुवारी २०२० रोजी जिवाची परवान करता नदीत बुडणाऱ्या तिघापैकी दोघाचे प्राण वाचवणाऱ्या कामेश्वर वाघमारे या बालकास राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार मिळाला परंतु मयत ओम मठपती याच्या कुटंबीयास अपघात विमा वर्षे भरापासुन मिळाला नव्हता याचाच पाठ पुरावा भाजपा महीला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रनिताताई देवरे-चिखलीकर यांनी केल्यामुळे प्रयत्ना मुळे मंजूर झाला .
जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सहकार्याने स्व गोपीनाथराव मुंडे अपघात विमा मंजूर करुन घेतला. मयत मुलाच्या कुटुंबाला २ लक्ष रुपये मंजूर झाले मयताच्या कुटंबीयास आधार मिळाला.
चिखलीकर कुटुंब नेहमीच असा प्रकरणात सहकार्य करण्यास तत्पर असते . असे भाजपा शहराध्यक्ष गंगाप्रसाद
यन्नवार यांनी सांगितले .