फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यातील बहाद्दरपुरा येथील रहिवासी असलेल्या सौ. ज्योती राजेश वंजे यांनी पुणे येथे भारतातील सुप्रसिद्ध बॉलिवूड मेकअप आर्टिस्ट समिर सावला आयोजित मास्टर क्लास स्पर्धेत सहभाग घेऊन बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड आज दि.5 मार्च रोजी मिळवला असून प्रशस्तीपत्र देण्यात आले.कंधार तालुक्यातील लेकीचा पुण्यात सन्मान झाल्याने कौतुक होत आहे.
सौ. ज्योती यांना अगदी लहान वयातच शैक्षणिक जीवनापासूनच सौंदर्य क्षेत्रात कमालीची आवड होती.
त्यामुळेच त्यांनी कंधारसारख्या सामान्य शहराततील मुलींना त्याचा फायदा व्हावा म्हणून काया ब्युटी सलून नावाने प्रशिक्षण केंद्र ही सुरू केले आहे.
त्याच आवडीचं रूपांतर आपल्या जिद्दीच्या जोरावर व पतीदेवाच्या सहकार्याने याच सौंदर्य क्षेत्रात कार्य करण्याचा निर्णय घेतला आणि तोच निर्णय नेटाने व धाडसाने कार्यप्रणालीत उतरवण्यासाठी नुकतेच पुणे येथे आयोजित मेकअप क्लास मध्ये सहभागी होऊन आपल्या कार्याचा मन्याडी ठसा उमटवत बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड मिळवला असल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.