कंधार :- प्रतिनिधी (हानमंत मुसळे)
तालुक्यातील नावद्याचीवाडी येथील बालाजी शंकरराव केंद्रे पोलीस पाटील हे 33 वर्षे सेवा बजावुन वयाच्या 60 व्या वर्षी सेवानिवृत्त झाले .पोलीस स्टेशन कंधार चे पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या हस्ते सत्कार केला.
यावेळी साहाय्यक पोलीस निरीक्षक सातानुरे , नामदेव राठोड (पो. काँ.), तुकाराम जुन्ने (पो.काँ.), गंदलवाड (पो.काँ.), सुनिल पञे (पो.काँ.) आदिची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
बालाजी केंद्रे (पोलीस पाटील) यांनी 33 वर्षाच्या सेवेच्या कार्यकाळात तंटामुक्त व व्यसन मुक्त गाव केले व गावातील तंटे गावातच मिटवले ते पोलीस स्टेशन पर्यत येऊ दिले नाही. दोन वेळा ग्राम पंचायत नावद्याचीवाडी बिनविरोध्द काढली, अनेकाचे संसार उध्दवस्त होण्याच्या मार्गावर आलेले जुळवून संसार व्यवस्थित करुन मार्गी लावले व काही फारकत (घटस्फोट ) झालेली संसार पुन्हा जुळवून देऊन संसार सुरळीत केले.
गावाच्या व गावक-याच्या हिताच्या कामाला प्राधान्य देत उत्कृष्ट कार्य केले त्यामुळे त्याच्या कार्याची दखल घेऊन तत्कालीन पोलीस अधिक्षक, नांदेड लक्ष्मीनारायण यांनी सन्मानपञ व 500 रुपये बालाजी केंद्रे यांना देऊन यथोचित सन्मान केला होता.
सर्व क्षेञातुन बालाजी केंद्रे यांचा सत्कार व सन्मान होत आहे.