प्रशासन आपल्या गावी कार्यक्रम अंतर्गत बारुळ येथे पालकमंत्री पांदन रस्त्याच्या कामास सुरुवात ;तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांचा पुढाकार

कंधार ; प्रतिनिधी

प्रशासन आपल्या गावी कार्यक्रम अंतर्गत कंधार तालुक्यातील बारूळ येथे व्यंकटेश मुंडे तहसीलदार कंधार यांच्या अध्यक्षतेखाली व पुढाकाराने दि.५ मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आला.यावेळी पालकमंत्री पांदन रस्त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली.

उद्यगिरी लायन्स हाॅस्पिटल यांच्या वतीने बारूळ येथे आयोजित नेत्र तपासणी शिबीराचे उद्घाटन करण्यात आले व त्यानंतर ग्रामपंचायत वतीने नियोजीत पालकमंत्री पांदन रस्ता उध्दघाटन व प्रत्यक्ष कामास सुरुवात केली.

त्यानंतर दुपारी प्रत्यक्ष ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. त्यात नायब तहसिलदार विजय चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. तसेच कृषी अधिकारी रमेश देशमुख यांनी कृषीविषयक सविस्तर मार्गदर्शन केले.

गटविकास अधिकारी प्रतिनिधी विस्ताराधिकारी शिवराम मुंडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच उस्माननगर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक जमदाडे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर गावातील विविध समस्या व निराकरण करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शन तहसिलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले. सदरील कार्यक्रमांतर्गत उपविभागीय अभियंता पाणीपुरवठा डिकळे , सार्वजनिक बांधकाम विभागाचे नागरगोजे, गटविकास अधिकारी प्रतिनिधी कैलास होनधर्णे, उपअभियंता बांधकाम भरणे, पंचायत समिती कक्ष अधिकारी तावडे साहेब,एपीओ कदम, विद्युत वितरणचे अभियंता मोरे , संजय गांधी निराधार योजनेचे लिपिक बारकोजी मोरे , आॉपरेटर टोपारे, सहकार विभागाचे कोकणे , तहसील चे अव्वल कारकून अविनाश पानपट्टे, समन्वयक मन्मथ थोटे व कंधार तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख व त्याचे सहकारी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *