कोरोना महामारीतही दत्तात्रय एमेकर यांच्या वतीने पाठवलेली १५ फुटाची महाराखी व सदिच्छा पत्रे सिमेवरील सैनिकांना पोहंचली
कंधार ; साईनाथ मळगे
गेली सहा वर्षापासून अखंड चालत असलेला सैनिकांना राखी व शुभेच्छा संदेश उपक्रम कोरोना सारख्या महा भयंकर संकट काळातही बंद न ठेवता फक्त 15 फुटाची महाराखी व 50 सदिच्छा पत्रे 22 जुलै रोजी एका छोटेखानी कार्यक्रम घेवून शासनाच्या नियमावलीचे तंतोतंत पालन करुन महाराखी सिमेकडे रवाना करण्यात आले होते. मन्याड-गोदावरी खोर्यातील स्फुर्तीदायी उपक्रमातून पाठवलेल्या राख्या भारतीय बटालियनला ७ ऑगष्ट रोजी प्राप्त झाल्या असल्याचे भारतीय सैनिक शिवहरजी कागणे यांनी माहीती दिली.
कंधार येथिल सुंदर अक्षर सुधार कार्यशाळेच्या वतीने सदरील महाराखी व शुभेच्छा पत्रे पाठवण्यासाठी सुनिल पत्रे,योगगुरु नीळकंठ मोरे.राजहंस शहापुरे,दिगंबर वाघमारे,टीव्ही रिपोर्टर नितीन मारे शालेय विद्यार्थीनी कु.संतोषी गीते,कु.शिवानी गीते,प्रज्ञा गीते,यांनी सहभाग नोंदवला होता. उपस्थिती लावली होती विशेष म्हणजे कु. सिध्दी सुनिल पत्रे या चिमुकलीचे इंग्रजीतून व अन्य भगिनीचे हिंदी भाषेतील पत्रे सैनिक बांधवाना पाठवण्यात आली होती.