बिलोली शहरातील विद्युत खांबावरील लाईट दिवसाही सुरूच..; ग्राहकांना शेकडो युनीटचा लागतो चुना
बिलोली; नागोराव कुडके
शहरातील सर्व गल्ली वार्डातील विद्युत खांबावर लावण्यात आलेल्या विद्युत खांबावरील मरक्युरी(स्ट्रीट लाईट) दिवसाही सुरूच असल्याने दरदीवशी शेकडो युनिट विज वाया जात आसल्याचे चिञ पहावयास मिळत आहे.विशेष म्हणजे याबाबत पालकमंञ्यांनी घेतलेल्या एका बैठकीतही हा विषय चर्चीला गेले माञ त्यावर अध्याप उपाययोजना झाली नसल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
शहरासह ग्रामीण भागातील गल्ली,बोळ,रस्ते व मार्गावर राञीच्या सुमारास अंधाराचा गैरफायदा घेऊन अघटीत घटना घडू नये या उद्देशाने रस्ते व गल्ली बोळातील विजेच्या खांबावर स्ट्रीट लाईट किंवा बल्प लावल्या जातात.हे स्ट्रीट लाईट सायंकाळी दिवस मावळताच सुरू होऊन सकाळी दिवस उजडताच बंद होणे अपेक्षित असते.माञ बिलोली शहरातील बहुतांशी वार्डातील स्ट्रीट लाईट गेल्या काही महिन्यापासून दिवसाही सुरूच राहत असल्याचे पहावयास मिळत आहेत.विद्युत खांबावरील स्ट्रीट लाईट दिवसासह राञीही म्हणजे विनाकारण चोवीस तास सुरूच राहत असल्याने दरदिवशी शेकडो युनिट विज वाया जात आहे.सध्या सर्वञ घरगुती विज बिला संबधिच्या तक्रारी होत असताना दुसरीकडे दररोज शेकडो युनिट विजेचा अपव्यय होत असून विणाकारण वीज वाया जात आहे. पालकमंञ्यांनी घेतलेल्या एका बैठकीत विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा प्रश्न उपस्थित करून विषय चर्चेला आणला खरा पण त्यावर अध्याप तरी काहीच उपाययोजना तयार करण्यात आल्याचे दिसून येत नाही.घरगुती विज वापरणाऱ्या ग्राहकांकडून कडक भुमिका घेत विज बिलाची वसुली करणाऱ्या विद्युत वितरण कंपनीने चोवीस तास स्ट्रीट लाईट सुरू मुळे वाया जाणाऱ्या शेकडो युनिट विजेकडे लक्ष देण्याची गरज आहे.