अजनीच्या माळावरील वन तलाव, वन्य पशू-पक्षी आणि झाडांची तहान भागवतो.
बिलोलीच्या दत्त टेकडीवरही वन तलावाची मागणी
बिलोली (नागोराव कुडके)
बिलोली तालुक्यातील अजनी येथील वन तलाव अनेक पशुपक्षी आणि वन्य प्राण्यांची तहान भागवतो आहे. असाच तलाव बिलोलीच्या दत्त मंदिराच्या टेकडीवरती उभारावा अशी मागणी होत आहे.
बिलोली तालुक्यातील अजनी येथील माळावर मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी आहेत. या वन्य प्राणी आणि पशु पक्षांना लागणारी तहान भागवण्याचे काम वनविभागाचा वन तलाव करतो आहे. येथे विविध पशु पक्षासह हरीण, काळवीट आदींचा मोठ्या प्रमाणात संचार होतो आहे. 30 बाय 30 चा या तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असल्यामुळे याचा उपयोग रानातील झाडांनाही प्रसंगानुसार करण्यात येत असल्याचे श्री कोटलवार यांनी सांगितले दरम्यान श्री कोळी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, वनविभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली आणि ती जगवण्यासाठी या तलावाच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग झालेला आहे. वनविभागाचा हा तलाव पशुपक्षी यासह विविध वन्यप्राण्यांना आणि झाडांनाही मोठा लाभदायक ठरला आहे आता बिलोलीच्या दत्त मंदिराजवळ असा तलाव असावा अशी मागणी प्रश्न सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक श्री गोविंद मुंडकर यांनी वन विभागाकडे केली आहे.