चैतन्य नगर येथे जागतिक आदिवासी गौरव दिन साजरा
नांदेड –
शहरातील ओंकारेश्वर नगर, चैतन्य नगर येथे नगरवासीयांकडून ९ आॅगस्ट हा जागतिक आदिवासी गौरव दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू अण्णा पिल्लेवार घोटीकर तर उद्घाटक म्हणून मुख्याध्यापकप्रकाश कदम हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीकारक राघोजी भांगरे, छत्रपती शिवाजी महाराज, जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम किशनराव फुले यांच्या यांच्या निवासस्थानी घेण्यात आला जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासींचं संरक्षण आणि सद्यस्थिती यावर उपस्थित मान्यवरांनी चर्चेत सहभाग घेतला. विशेष म्हणजे बिरसा मुंडा ग्रुपचे सक्रिय सदस्य तथा मित्र परिवाराचे प्रमुख संतोष ढोकणे यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमांमध्ये नगरमधील अनेक मान्यवर उपस्थित होते. आदिवासींच्या विविध प्रश्नाच्या संदर्भाने संपन्न झालेल्या चर्चेत किशनराव फोले, मच्छिंद्र नाईक राजेश्वर स्वामी, पी. डी. भोसले , मुन्ना स्वामी या मान्यवरांनी सहभाग घेतला. पुरुषच नव्हे तर ओंकारेश्वर नगर नगरसह परिसरातील अनेक महिला भगिनींनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून जागतिक आदिवासी दिनाचे चिंतन केले. शेवटी कार्यक्रमाची सांगता दिगंबर नाईक वाहतूक नियतन नियंत्रक वसमत यांनी केली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान सोशल डिस्टन्स ठेवण्यात आला होता.