आदिवासी समाजाचा उच्च शिक्षणातील टक्का वाढला – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड मुंबई – जागतिक आदिवासी दिनानिमित्त शालेय शिक्षण मंत्री व हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी आजच्या परिस्थितीत आदिवासी समाजाचा उच्च शिक्षणातील टक्का वाढला असल्याचा निष्कर्ष काढला आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करुन ही भूमिका मांडली आहे. स्वतंत्र जीवनशैली असणाऱ्या आदिवासी समाजाचे निसर्गाशी अतूट नातं आहे.आदिवासी समाज जंगलांपुरता मर्यादित राहिला नसून या समाजातून उच्चशिक्षित व स्पर्धा परीक्षांमध्ये नैपूण्य दाखवणाऱ्यांचा टक्का वाढला आहे,ही कौतुकास्पद बाब आहे. जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतांना ना. गायकवाड यांनी फेसबुकवर ही पोस्ट केली आहे. तसेच इंस्टाग्रामवरुनही त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. |