कंधार ; प्रतिनिधी
भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांचा कोरोना अहवाल पॉझेटिव्ह आला आहे.सध्या त्यांना होम कोरोन्टाईन करण्यात आले असून प्रकृती ठिक असल्याची माहीती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
माझा कोरोणा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे .त्यापुर्वी याच महिन्याच्या आठ तारखेपासून 12 तारखेपर्यंत ताप होती.दि.14 तारखेपासून कुठला ताप नाही, सर्दी नाही कुठलीच लक्षणे नाहीत परंतु फ्रेश वाटत नव्हतं म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने 18 मार्चला स्वॅप दिला तर 19 तारखेला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून 20 तारखेला मी माझ्या इतर तपासण्यासह, रक्त तपासणी, सिटीस्कॅन करून घेतलो असून सर्व तपासण्या नॉर्मल आल्यामुळे दवाखान्यात ऍडमिट राहायची गरज नाही असं डॉक्टरांनी सांगितल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या घेत आहे व कोणाच्या संपर्कात न राहता होम क्वारंटाईन आहे अशी माहीती भाजपा कंधार तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांनी दिली.
कोरोनाला घाबरू नका काही लक्षणे दिसत असतिल तर त्वरित आरोग्य विभागास संपर्क करा, तपासण्या करून घेऊन वेळेवर उपचार करून घ्या .आपणही नक्की कोरोणावर मात करू शकतो त्यासाठी कोरोना ला कोणी घाबरू नये. परंतु काळजी घ्यावी असे त्यांनी जनतेला भगवान राठोड यांनी विनंती केली आहे.